नागपूर :-पोलीस ठाणे यशोधरानगर हद्दीत चिलगाव, तिवारी नगर ग्रामपंचायत जवळ, नागपूर येथे राहणाऱ्या फिर्यादी रंजना प्रताप जुमडे वय ५३ वर्षे यांचा मुलगा आशिष जुमडे हा बंगलोर येथे व्यवसाय निमित्ताने राहत होता त्याला विदेशात नौकरी लागल्याने त्याने त्याचे घरगुती सामान नागपुर येथे पाठविण्यासाठी कुरीयर कंपनीचे ऑनलाईन बुकींग केले होते. दिनांक ०२.१०.२०२३ मे २३.३० या ते दिनांक ०४.१०.२०२३ १३.३० या दरम्यान नमुद सामान हे नागपुरला घरी न पोहचल्याने फिर्यादी यानी कुरीयर कंपनीबाबत गुगलवर सर्च केले होते. यावरून फिर्यादीस आरोपी मोबाईल ८३८८८२६२००७ या धारक तसेच मोबाईल क ९९८५०७९३६२ या मोबाईल धारकांनी फिर्यादीस विश्वासात घेवुन २/- रू. फोन पे व्दारे पाठविण्यास सांगीतले. फिर्यादीने पैसे पाठविले असता, त्यांचे बँकेचे खात्यातुन २,४४,३१५/- रु. आरोपांनी ऑनलाईन वळते करून फिर्यादीची आर्थीक फसवणुक केली.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे यशोधरानगर येथे पोउपनि सावतकर यानी आरोपीविरुद्ध कलम ४१९, ४२० भादवि सहकलम ६६ (क), ६६) आयटी अॅक्ट अन्वये गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध घेत आहे. पुढील तपास सुरू आहे.