काटोल :- फिर्यादी यांनी दि. ०७/०८/२०२३ रोजी त्यांनी त्यांचे मोबाईल मधुन ऑनलाईन शॉपींग अॅपवरुन २२५/- रु. किंमतीचे ८ नंबर शुज बुक केले होते ते शुज त्यांना दि. २१/०८/२०२३ रोजी प्राप्त झाले परंतु ते शुज त्यांना लहान झाल्याने त्यांनी ते परत केले परंतु त्याचे पैसे त्यांना मिळाले नसल्याने त्यांनी दि. २१/०८/२०२३ रोजी आपले मोबाईल वरून गुगलवर सदर अॅपचा कस्टमर केअर नंबर प्राप्त केले त्यातील एक क्रमांक बंद असल्याने त्यातील दुसऱ्या क्रमांकावर कॉल केला असता तेथुन त्यांना मोबाईल नंबर दिल्याने त्यांनी त्यावर कॉल केला असता सदर आरोपीने फिर्यादीचे व्हाट्सअपवर लिंक पाठवुन त्यांना सांगितल्याप्रमाणे करण्यास सांगितल्याने फिर्यादीने आरोपीचे सांगण्याप्रमाणे सर्व काही केले असता फिर्यादीचे मोबाईलवर त्यांचे खात्यातून १,००,०००/- रु. काढल्याचा संदेश प्राप्त झाला यामुळे फिर्यादीने घाबरुन मोबाईल बंद केला असता पुन्हा फिर्यादीचे खात्यातून १,००,०००/- रु. कपात झाल्याचा संदेश प्राप्त झाला. थोड्या वेळाने पुन्हा ९,२००/-रु. कपात झाल्याचा संदेश प्राप्त झाला. अशाप्रकारे अज्ञात आरोपीने डिजीटल मिडीयाचा वापर करून स्वतःचे आर्थिक फायदयासाठी फिर्यादीचे खात्यातून एकुण २,०९,२०० /- रुपयाची आर्थिक फसवणुक केली. सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रिपोर्ट वरून पो.स्टे. काटोल येथे आरोपीविरुध्द कलम ४२० भादंवि सहकलम ६६ (सी) (डी) माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि / शितल खोब्रागडे या करीत आहे.