सावनेर :- अंतर्गत ०५ कि. मी. अंतरावरील वार्ड क्र. २ वघोडा झोपडपट्टी येथे दिनांक ३०/०६/२०२३ चे १६.३० वा. ते दिनांक २२/०७/२०२३ २१.२४ वा. सुमारास फिर्यादी नामे- रिना राजु प्रजापती, वय ३२ वर्ष, रा. वार्ड क्र. २ वाघोडा झोपडपट्टी ही घराला लॉक लावून ग्वालीयर येथे शाळेत जॉब करते म्हणुन गेली होती तेव्हा ग्वालियर येथे फिर्यादीचा मानलेला भाऊ यांनी फिर्यादीस फोन करून सांगीतले की तुझ्या घराचे लॉक तुटलेले असुन सामान अस्तव्यस्त आहे यावरून फिर्यादीने येवून पाहले असता घराचे लॉक तुटलेले बाहेर पडलेले दिसले व स्वयंपाक खोलीत असलेले घरातील १) एक इंडियन कंपनीचे गॅस सिलेंडर व शेगडी किंमती अंदाजे ५०००/-रु.२) एक भारत कंपनीचा गॅस सिलेंडर व शेगडी किंमत अंदाजे ५००० /- रु. ३) एक लोखंडी स्टुल किमती अंदाजे १०००/- रू ४) दोन स्टीलचे पिंप किंमती अंदाजे १००० /- रू. ५) दोन पितळी गुंड किंमती अंदाजे १२००/-रु असा एकुण १३२००/-रूपयाचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीने घराचे समोरील कुलुप तोडुन आत प्रवेश करून घरातील वरील प्रमाणे मुद्देमाल स्वतः चे आर्थीक फायदयासाठी चोरून नेला आहे. सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. सावनेर येथे आरोपीविरुद्ध कलम ४५४, ४५७, ३८० भादवि. कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस हवालदार राजेश हावरे हे करीत आहे.
घरफोडी करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com