उमरेड :- अंतर्गत मौजा दुर्गानगरी उमरेड २ किमी पूर्व, यातील फिर्यादी हा डी. जे. वाजविणे चा व्यवसाय करतो व त्याचे सोबत ४ मुले काम करतात, फिर्यादीने सामान ठेवणे करीता दुर्गानगरी येथे किरायची रूम केली असून त्या रूममधे फिर्यादी डी. जे. चे सामान ठेवतो. दि. १२/०७/२३ रोजी सोनेझरी उमरेड येथील डी. जे. या ऑर्डर करून रात्री ११/०० वा सामान किरायचे घरात ठेवून कुलूप लावून घरी गेले व दिनांक १६/०७/२३ रोजी दत्तकृपा लॉन मधे ऑर्डर असल्याने सायंकाळी ५/०० वा सामान आणण्यासाठी फिर्यादी गेले असता, तेव्हा तिथे फिर्यादीला १) जुने वापरते अॅम्पलीफायर पी डी ५००० ज्याचा सिरीयल क. १९०५००९५ किमती अंदाजे २५,०००/- २) की ९००० कंपनीचे डिजे किमती ३०,०००/रु३) डीपी, एकस कॉसर कि, ४,००० रु ४) पेटी किंमती अंदाजे ६,०००/रु, असा एकूण किंमती ६५,०००/ रुपयाचा माल दिसून आला नाही. फिर्यादीने दि २२/०७/२३ पर्यंत शोध केला मिळून आला नाही.
सदर प्रकरणी फिर्यादी नामे सचिन भास्कर भजनकर वय २८ वर्ष रा. इतवारीपेठ उमरेड यांचे रिपोर्टवरून पो.स्टे. उमरेड येथे आरोपी विरुध्द कलम ४५४,४५७, ३८० भादवी अन्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास अधिकारी पो हवा / प्रदिप चवरे हे करीत आहे.