सावनेर :- अंतर्गत ०१ कि. मी. अंतरावरील हनुमान मंदीर कडकडी महाराज देवस्थान समीती सावनेर येथे दिनांक १७/०७/२०२३ मे २०.३० वा. से दिनांक १८/०७/२०२३ चे ०६.०० वा. दरम्यान कोणीतरी अज्ञात चोराने मंदिराचे समोरील गेटचा ताला तोडुन मंदीराचे आत प्रवेश करून मंदिराचे आत ठेवलेल्या दानपेटीचे दोन्ही ताले तोडुन त्यामधील लोकांकडुन दानपेटीत दान म्हणून जमा झालेले अंदाजे ४००० /- रू चोरी करून घेऊन गेले. सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. सावनेर येथे आरोपीविरुध्द कलम ४५७, ३८० भादवि. कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस हवालदार सुभाष राठोड हे करीत आहे.