मौदा :- अंतर्गत ०१ किमी अंतरावर मौजा मौदा धांडे ऑटो सर्व्हिसेस चे मालक यांचे घर येथे दिनांक सम्भु कुमार महेंद्र सिंग वय २८ अंसारी, वय २२ वर्ष, रा. टाटी, १४/०१/२०२४ चे २०.०० वा. ते २०.३० वा. दरम्यान यातील जखमी नामे वर्ष, रा. बेचुडीया, पुरहरा, जि. औरंगाबाद बिहार व आरोपी नामे समसाद अमानत पोस्ट कुडु, लोहदगा झारखंड हे त्यांचे मित्रासह एकाच रूम मध्ये राहत होते, जखमी कडून आरोपीने पैसे उधार घेतले होते. त्यावरून त्यांच्यात पैशाच्या वादावरून झगडा भांडण होत होते. फिर्यादी नामे मुन्नाकुमार वल्द रामप्रितराम कुमार वय २३ वर्ष, रा. ग्राम पोस्ट तंडवा, आचल नयी नगर ब्लॉक जि. औरंगाबाद राज्य बिहार, ह. मु. धांडे ऑटो सर्व्हिसेसचे मालक यांच्या घरी किरायाने मौदा, जखमी व आरोपी हे त्यांच्या मित्रासह घरी हजर असताना त्यांच्या बाजुच्या रूम मधील आरोपीचा मित्र आरोपीला भेटायला आला असता जखमी याने म्हटले की, “आज इधर आना नही, तुम कल आकर बात करना” त्यावर तो वापस गेला. नंतर आरोपी याने फिर्यादीला म्हटले की, “तुने मेरे दोस्त को ऐसा क्यो बोला” असे म्हणून हाताने चेहrयावर बुक्की मारली असता फिर्यादीच्या डाव्या डोळया जवळ जखम झाली, तेव्हा जखमीने आरोपीला हटकले व फिर्यादी याला समजावत असताना आरोपी याने मागेहून येऊन किचनच्या ओटयावर असलेला भाजी कापण्याचा चाकू घेऊन जखमीच्या गळ्यावर वार करून जिवाने मारण्याचा प्रयत्न केला आहे. यावरून सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रिपोर्टवरुन पो.स्टे. मौदा येथे आरोपीविरुध्द कलम ३०७, ३२३ भादवी अन्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर घटनास्थळी मा. उपविभागीय पोलीस अधिकारी कन्हान विभाग कन्हान श्री. पुंडलिक भटकर तसेच पोलीस निरीक्षक सार्थक नेहते, चार्ज पोस्टे मौदा यांनी भेट दिली असुन गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मनोज चौधरी, हे करीत आहे.