मौदा :- अंतर्गत २४ कि.मी अंतरावरील मौजा आसोली शिवार येथे दिनांक २९/०८/२०२३ मे १३.०० वा. दरम्यान फिर्यादी नामे श्रिराम गोपाळराव चंडी मेश्राम, वय ५२ वर्ष, रा. आसोली ता. कामठी जिल्हा नागपुर याचा भाऊ नामे- बबन गोपाळराव चंडीमेश्राम हा आपल्या १५ बकऱ्या चारण्याकरीता आसोली शिवारात नाग नदीच्या काठावर गेला असता आरोपी भगवे कपडे घातलेला महाराज इसम वय अंदाजे ४५ वर्ष रा. आसोली यांच्यामध्ये वादविवाद झाला त्यावरून फिर्यादीचा भाऊ जखमी हा आसोली टाटा जायका मोटर्स बाय टपरी जवळ उभा असता आरोपी हा तेथे येवून हातात टिकाशीचा दांडा घेवून आला व फिर्यादीचा भाऊ बबन गोपाळराव चंडी मेश्राम याच्या डोक्यावर मारून याला गंभीर जखमी केले व जिवानीशी ठार मारण्याचा प्रयत्न केला. सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रिपोर्ट वरून पो.स्टे. मौदा येथे आरोपीविरुध्द कलम ३०७ भादंवि अन्वये गुन्हा नोंद केला आहे. गुन्हयाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक नगराळे हे करीत आहे.
जिवानीशी ठार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com