कुही :- पोलीस स्टेशन कुही येथील स्टाफ यांनी पोलीस स्टेशन कुही परीसरातील अवैध धंदयावर रेडकामी पेट्रोलीग करीत असतांना विश्वसनीय मुखवीरद्वारे खबर मिळाली की, कुही कडुन पाचगाव गावाकडे येणाऱ्या रोडनी रेती भरलेला १० चक्का टिप्पर येत आहे यावरून पाचगाव कडे जाणा-या आकोली पुलीयाचे रोडवर नाकांबदी केली असता दि. १३/०२/२०२४ चे २३.३० वा. दरम्यान कुही कडून पाचगावकडे जाणाऱ्या मौजा आकोली गावाजवळील पुलीया जवळ १० चक्का टिप्पर क्र. MH 40 BF 4824 येतांनी दिसले. त्यास नाकाबंदी दरम्यान थाबवुन टिप्परची पाहणी केली असता सदर टिप्परमध्ये रेती भरलेली दिसून आल्याने टिप्पर मधील असलेल्या चालकास त्याचे नाव गाव व पत्ता विचारले असता त्यानी आपले नाव १) दर्शन शंभुजी रामटेके, वय २१ वर्ष रा. पाचगांव ता. उमरेड जि. नागपुर, क्लिनर नामे २) अनुराग राजकुमार पंढरे वय १९ वर्ष रा. नवेगाव पोस्ट सालई ता. उमरेड जि. नागपुर, असे सांगीतल्याने त्यावरून त्यांना रेती व वाहतुकीचा परवाना विचारले असता रेतीचा कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्याचे सांगीतले. सदर टिप्परमधील रेती कोठुन आणले याबाबत विचारणा असता सदरची रेती हि पवनी जि, भंडारा येथील नांदेळ घाटावरून रेती आणल्याचे सांगीतले. आरोपीतांकडून १० चक्का टिप्पर क्र. MH 40 BF 4824 कि. ३०,००,०००/- रू. टिप्पर मध्ये बिना परवाना ०६ ब्रास रेली ३०,०००/- रू. असा एकूण ३०,३०,०००/-रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीतांविरूद्ध कलम ३७९, ३४ भादवी सहकलम ४७ (७), ४८(८) महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ सहकलम ४, २१ खाणी आणि खनिजे (विकास आणि नियमन) अधिनियम १९५७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधिक्षक रमेश भुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे कुही येथील ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक अमितकुमार आत्राम, पोहवा हरीदास चाचरकर, पोलीस अंमलदार देवेंद्र बुटले, पंकज सावरे, राहुल देविकार यांनी पार पाडली.