अरोली :- अंतर्गत १२ कि.मी. अंतरावरील मौजा वाकेश्वर शिवार येथे दिनांक ०६/१०/२०२३ चे १२.०० वा. दुपारी ते दि. ०७/१०/२०२३ ला दुपारी १२ / ३० वा. चे सुमारास फिर्यादी सिताराम नामदेव आकरे रा. नांदगाव ता. मौदा जि. नागपूर हे घरी हजर असतांना त्यांचे राईस मिलचे दिवानजी -अरुण श्यामराव वैद्य, रा. खरडा यांनी फिर्यादीला फोन करून राईस मिलचे शटरचे लॉक तुटले असुन शटर उघडे आहे असे सांगीतल्याने फिर्यादी लगेच राईस मिलमध्ये आले असता अरुण वैद्य हे राईस मिल समोर हजर होते राईस मिलचे शटरचे लॉक तुटलेले व शटर उघडे असल्याचे दिसल्याने दोघानी राईस मिलमध्ये जाउन पाहीले असता राईस मिलच्या मशीनला लागलेले व राईस मिलमध्ये असलेले १) ४० एच. पी. चे मोटार (क्रॉम्पटन विज) २ नग प्रती कीमती – १०,०००/- रुपये एकुण २०,००० /- रुपये २) १५ एच. पी. चे मोटार (चायना सेलर) २ नग किंमती ५,०००/- रुपये ३) १० एच. पी. चे मोटार (रबर सेलर) १ नग किंमती – ५,०००/- रुपये ४) ३ एच. पी. वे मोटार (सेन्टेयर) ३ नग प्रती किंमती – २,०००/- असा एकूण किंमती ६०००/-रुपये ५) २ एच. पी. चे मोटार (डोस्टोनर ) २ नग प्रती किंमती – २,०००/- रुपये असा एकूण किंमती ४०००/- रुपये ६) १ एच पी मोटर (एफ आर के) १ नग किंमती २०००/- रुपये ७) २ एच पी मोटर (सिप्टर) १ नग २०००/- रुपये अशा एकूण १९ मोटर सर्व मोटारीची एकुण किंमती ४४०००/- रुपयाचा मुद्देमाल तसेच ८) १ लोखंडी काटा स्टैन्ड किंमती ४००० /- रुपये ९) २ ईलेक्ट्रीक काटे प्रती ४०००/- किंमती याप्रमाणे एकुण ८०००/- रुपये १०) तसेच एकुण वेगवेगळ्या वजनाचे एकुण १२ वजन (ट) एकुण किंमती ५०००/- रुपये असा संपूर्ण एकुण ६१०००/- रुपयाचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेला आहे.
सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. अरोली येथे आरोपीविरुध्द कलम ४५४, ४५७, ३८० भादवि. कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. आरोपीचा शोध येणे सुरू असून गुन्हयाचा पुढील तपास पोलीस नायक संदिप बाजघाटे हे करीत आहे.