अवैध रेती चोरी करणाऱ्या आरोपीविरूद्ध गुन्हा नोंद

मौदा :- दिनांक १५/०१/२०२४ रोजी पोस्टे मौदा येथील पोलीस पथक पोस्टे मौदा हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना मुखविरव्दारे खबर मिळाली की, पोलिस ठाणे मौदा हद्दीतील १४ किमी अंतरावर मौजा किरणापुर घाट येथे अवैधरीत्या विनापरवाना रेतीची विना नंबरची ट्रॅक्टर ट्रॉली व्दारे चोरटी वाहतुक होत आहे. अशा मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोस्टे मौदा येथील पथकाने नमुद घटनास्थळी नाकाबंदी केली असता आरोपी नामे देवानंद पंढरी वढवे, रा. नान्हादेवी ता. मौदा, जि. नागपुर हा किरनापुर घाट नदीच्या पात्रातील रेती अवैधरित्या विनापरवाना वाहतुक करतांना मिळुन आला सदर आरोपी वाहतुक करीत असलेल्या विना नंबरची ट्रॅक्टर ट्रॉली त्याची किंमत ५,५०,०००/- रू. झाली किंमती १,००,०००/- रु. एक ब्रास रेती किंमती ३,०००/-रू. असा एकुण ६,२३,०००/-रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर प्रकरणी सरकारतर्फे फिर्यादी नामे रोशन सुरेश पाटील, पोलीस ठाणे मौदा यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. मौदा येथे आरोपीविरुध्द कलम ३७९ भादंवि, सहकलम ४८(८) महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर घटनास्थळी सहायक पोलीस निरीक्षक निशा भते मॅडम यांनी भेट दिली असुन गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक निशा भते या करीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ग्रेडल लेव्हलिंगने शेतकऱ्याला चिरडले

Thu Jan 18 , 2024
बेला :- सोनेगाव बेला हा रस्ता नव्याने सिमेंट काँक्रीटचा होत आहे. बांधकाम सुरु असताना दहेली येथील शेतकऱ्याला मुरूम पसरवणाऱ्या ग्रेडर मशीनने वीस फूट फरकटत नेले. त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. भाऊराव पांडुरंग आंबुलकर वय 70 रा. दहेली असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ते आपल्या शेतात काल 17 जानेवारी बुधवार ला सायंकाळी 5 वाजताचे सुमारास वन्य प्राण्यांपासून शेताचे संरक्षण व्हावे यासाठी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com