– पोलीस स्टेशन सावनेरची कार्यवाही
सावनेर :- पोलीस स्टेशन सावनेर येथील स्टाफ सावनेर उपविभागात पेट्रोलिंग करीत असतांना मुखबिरव्दारे खबर मिळाली की, पोलिस ठाणे सावनेर हद्दीतील हनुमान मंदिर समोर अवैधरीत्या विनापरवाना रेतीची टिप्पर व्दारे चोरटी वाहतुक होत आहे. अशा मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलीस स्टेशन सावनेर येथील स्टाफ याने नमुद घटनास्थळी जावून टिप्पर क्र. एम. एच. ४० वाय.- ७९९५ च्या चालकाला थांबवून तपासले असता सदर वाहनात टिप्पर चालक आरोपी नामे- १) अक्षय दिलीप दियेवार, वय २६ वर्ष, रा. वार्ड क्र. १३ चिचपूरा खापा ता. सावनेर २) क्लिीनर नामे- पवन सेवकराम लाटकर, वय १९ वर्ष, रा. वार्ड क्र. ३ नंदापुर ता. सावनेर यांनी संगनमत करून त्यांचे ताब्यातील टिप्परमध्ये अवैधरीत्या रेतीची चोरी करतांना मिळुन आल्याने त्याच्या ताब्यातून १) ०६ बॉस रेती किमती अंदाजे १५,०००/- रु. २) टिप्पर क्र. एम. एच. ४० / वाय- ७९९५ किंमती १०,००,००० /- रु ३) दोन वेगवेगळ्या कंपनीचे अॅन्ड्राईड मोबाईल किमती अंदाजे १०,०००/- रु. असा एकूण १०.२५,०००/- रुपयाचा मुद्देमाल वाहतूक करतांना मिळून आल्याने आरोपीतांच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेला आहे..
सदर प्रकरणी सरकारतर्फे फिर्यादी नामे- पोलीस हवालदार संजय शिंदे व नं. ११६१ पोस्टे सावनेर यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. सावनेर येथे आरोपीतांविरुध्द कलम ३७९, ३४ भादवि. कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे.. पुढील तपास पोलीस हवालदार हावरे व नं. १५४६ पोस्टे सावनेर मो. नं. हे करीत आहे.