अवैध रेती चोरी करणाऱ्या आरोपीतांविरूद्ध गुन्हा दाखल 

– पोलीस स्टेशन पारशिवनीची कार्यवाही

पारशिवनी :- दिनांक ०१/०६/२०२३ रोजी पोलीस स्टेशन पारशिवनी येथील स्टाफ रामटेक उपविभागात पेट्रोलिंग करीत असतांना मुखबिरव्दारे खबर मिळाली की, पोलिस ठाणे पारशिवनी हट्टीतील मौजा पारडी शिवार येथे अवैधरीत्या विनापरवाना रेतीची ट्रक व्दारे चोरटी वाहतुक होत आहे. अशा मिळालेल्या गुप्त माहितीवरून मौजा पारडी शिवार येथे पारशिवनी पोलिस स्टाफ यांनी ट्रक क्रमांक एम. एच. ४०/ ०६०५ चे चालक नामे फुलचंद रामकुमार कश्यप, वय ४९ वर्ष, रा. वलनी माईन्स, वार्ड नं. ०३ ता. सावनेर २) ट्रक क्रमांक एम. एच. ४० वाय-०४०५ चालक नामे महेश जगदिश कोसरे, वय ३६ वर्ष, रा. कोराडी पांजरा, वार्ड नं. ०१ ता. कामठी ३) तबरेज सिध्दीकी, रा. दहेगाव रंगारी हे ट्रक व्दारे अवैधरीत्या रेतीची चोरी करतांना मिळुन आल्याने त्यांच्या ताब्यातून १) ट्रक क्रमांक एम. एच.४० वाय- ०६०५ किमती अंदाजे १५,००,०००/- रू. २) इक क्रमांक एम. एच. ४० वाय- ०४०५ किमती अंदाजे १५,००,०००/- रू. ३) दोन्ही ट्रकमधील प्रत्येकी ५ ब्रास प्रमाणे एकुण १० ब्रास रेती किमती ५०,०००/- रु. ४) वाळू साठयाचे ठिकाणावरील अंदाजे १००० ब्रास रेती किंमती ५०,००,०००/- रु. ५) एक पोकलेन मशिन किमत ४०,००,०००/- रु. असा एकुण १,२०,५०,०००/- रूपयाचा मुद्देमाल आरोपीतांच्या ताब्यातुन जप्त करण्यात आलेला आहे. सदर प्रकरणी पो.स्टे. पारशिवनी येथे आरोपीतांविरुद्ध कलम ३७९, १०९ ३४ भादंवि अन्वये गुन्हा नोंद केला असुन गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मढ़े पोस्टे पारशिवनी हे करीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

घरफोडी करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

Sat Jun 3 , 2023
पो.स्टे. मौदा :- अंतर्गत ०.५ कि.मी. अंतरावरील मौदा येथे दिनांक ३१/०५/२०२३ मे १०.०० वा. ते दिनांक ०१/०६/२०२३ ०.०३ वा. दरम्यान फिर्यादी नामे राजु चुडामन नाकाडे, रा. मौदा याचे घरी आत प्रवेश करून फिर्यादीचे १० ग्रॅम सोन्याची पोत किंमती अंदाजे ३०,०००/- रु. ०२ ग्रॅमचे ०२ अंगठी किमती अंदाजे २५००/-रु.०१ ग्रॅम सोन्याची मनगटी २५००/- रु. पायातील चांदीचे किंमती अंदाजे ५००/- रु व […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com