नागपूर :- पोलीस ठाणे हुडकेश्वर हद्दीत प्लॉट नं. ७६, महाजन ले-आउट, लक्ष्मीनारायण मंदीर समोर, नागपूर येथे राहणारे फिर्यादी नामे विजय केशवराव कुकडे वय ५५ वर्ष यांनी त्यांचे शेतात विज पुरवठा आणने साठी मौजा विहीरगाव, सर्वे नं. १६५/१, सुनिल भेंडे यांचे शेतात एकुण ७ लोखंडी पोल व ईलेक्ट्रीक साहित्य असा एकुण किंमती अंदाजे १,७५,०००/- रू. चा मुद्देमाल घटनास्थळी आणून ठेवला असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचा नमुद मुद्देमाल चोरून नेला.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे हुडकेश्वर येथे पोउपनि, आठवले यांनी अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०३(२) भाल्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आहे.