चोरी करणा-या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल 

मौदा :- अंतर्गत मौजा तारसा जॉईड १२ किमी पश्चिम येथे दि. २७/०८/२३ रोजी नेहमीप्रमाणे आपलेच घरी मोटर पंप दूरुस्ती करण्याचे काम करतात, आजूबाजूचे गावातील शेतकरी लोक त्यांचे घरी मोटर पंप दूरुस्ती करण्याकरीता आणतात. दि. २७/०८/२३ चे सकाळी ०७/०० वा फिर्यादी हे घराबाहेर गेले व ०८/०० वा घरी परत येत असता, आरोपी नामे- मंगेश वसंत गिहाने वय ३० वर्ष बेलोरी ता. कळमेश्वर जि. नागपूर हा फिर्यादींचे घरी दूरुस्ती करीता आलेली मोटर पंप कि.५,००० रू. चोरुन घेउन जातांना दिसला, त्याला हटकले असता तो मोटर पंप सोडून पळून गेला.

सदर प्रकरणी फिर्यादी नामे विनायक हूसन मेश्राम वय ४९ वर्ष रा. तारसा जॉईड ता. मौदा यांचे रिपोर्टवरून पो.स्टे. मौदा येथे आरोपी नामे- मंगेश वसंत गिहाने वय ३० वर्ष रा बेलोरा ता. कळमेश्वर जि नागपूर यांचे विरुद्ध कलम ३७९, ५११ भादवी अन्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोहवा असलम हे करीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अल्पवयीन मुलाला पळवून नेणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

Tue Aug 29 , 2023
सावनेर :- अंतर्गत मौजा पांटगसावगी १२ कि.मी पूर्व यातील अल्पवयीन पिडीत मुलगा वय १५ वर्ष ७ महिने हा बाथरूमला बाहेर जातो, असे सांगुन घरून दिनांक २६/०८/२३ चे १५/०० वा. दरम्यान गेला असता, आज पावेतो परत आला नाही, फिर्यादीचे ने पती ने गावातील नदीकडे आजुबाजुच्या परीसरात व नातेवाईकांकडे, मित्राकडे शोध घेतला असता मिळून आला नाही. तरी त्याला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कोणत्यातरी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!