– नागपूर ग्रामीण पोलीसांची कारवाई
मौदा :- मौदा येथील स्टाफ पोलीस ठाणे मौदा हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय सूत्रधाराकडून माहीती मिळाली की, भंडारा कडून नागपुरकडे अवैधरीत्या विनापरवाना रेती टिप्पर ट्रक मध्ये लोड करून वाहतूक करीत आहे. अशा खात्रीशीर बातमीवरून रखडीवाला वाय पॉईंट मौदा येथे नाकाबंदी केली असता टिप्पर वाहन क्र. MH 40 CM 1112 यास स्टाफने थांबवून पाहणी केली असता सदर वाहनात एकुण अंदाजे ०६ ब्रास रेती मिळून आल्याने सदर वाहन चालक आरोपी अनिल गंगाराम चौधरी, वय २८ वर्ष, रा. डोंगरगाव ता. कुही जि. नागपुर यास ट्रक मधील रेतीचे रॉयल्टी बाबत विचारणा केली असता रॉयल्टी नसल्याचे सांगितल्याने व सदरची रेती ही चोरीची असल्याची खात्री झाल्याने आरोपीच्या ताब्यातून टिप्पर वाहन क्र. MH 40 CM 1112 किंमती अंदाजे ३५,००,०००/- रू. मध्ये ०६ ब्रास रेती किंमती २४,०००/- रू. असा एकुण ३५,२४,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन नमुद आरोपीविरुद्ध पोलीस ठाणे मौदा येथे अपराध क्र. ४१७/२४ कलम ३७९ भारतीय दंडविधान संहीता-१८६०, सहकलम ४८ (७), ४८(८) महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६, सहकलम ४, २१ खानी आणि खनीजे (विकास आणि नियमन) अधिनियम १९५७, सहकलम ३ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतीबंधक अधिनियम १९८४ अन्वये पोलीस येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ, डॉ. संतोष गायकवाड उपविभागिय पोलीस अधीकारी कन्हान, सतिशसिंह राजपुत वरिष्ठ पोलिस निरीक्षक पोलीस ठाणे मौदा यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मनोज चौधरी, पोलीस हवालदार राजेंद्र गौतम, पोना अजय वाघमारे, पोलीस अंमलदार अतुल निंबार्ते, शुभम ईश्वरकर, आशिष रडके पोलीस ठाणे मौदा नागपूर ग्रामीण यांनी केली