– नागपूर ग्रामीण पोलीसांची कारवाई
नागपूर :-दिनांक ०५/०४/२०२४ रोजी मौदा येथील स्टॉफ पोलीस ठाणे मौदा हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय सूत्रधाराकडून माहीती मिळाली की, भंडारा कडून नागपुरकडे अवैधरीत्या विनापरवाना रेती एलपी मध्ये लोड करून वाहतूक करीत आहे. अशा खात्रीशीर बातमीवरून मारोडी येथे नाकाबंदी केली असता LP वाहन क्र. MH 27 BX 7983 यास स्टाफने थांबवून पाहणी केली असता सदर वाहनात एकुण अंदाजे १२ ब्रास रेती मिळून आल्याने सदर वाहन चालक आरोपी क्र. ०१) चतुर्भुज नंदलाल पवार, वय ३३ वर्ष, रा. गल्ली नं. ०३ लोहार लाईन, विलास नगर अमरावती ता. जि. अमरावती तसेच वाहक आरोपी क्र. ०२) राहुल अनिल हिरुडकर वय २३ वर्ष रा. येवदा ता. दर्यापुर जि. अमरावती यांना ट्रक मधील रेतीचे रॉयल्टी बाबत विचारले असता रॉयल्टी नसल्याचे सांगितल्याने व सदरची रेती ही चोरीची असल्याची खात्री झाल्याने आरोपीच्या ताब्यातून LP वाहन क्र. MH 27 BX 7983 किंमती अंदाजे ४०,००,०००/- रू. मध्ये १२ ब्रास रेती किंमती ४८,०००/- रू. असा एकुण ४०,४८,०००/- रुपये चा मुद्देमाल जप्त करून ०२ आरोपी यांचेविरुद्ध पोलीस ठाणे मौदा येथे अपराध क्र. ४१३/२४ कलम ३७९, १०९, ३४ भारतीय दंडविधान संहीता १८६०, सहकलम ४८ (७), ४८(८) महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६, सहकलम ०४, २१ खानी आणि खनीजे (विकास आणि नियमन) अधिनियम १९५७, सहकलम ३ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतीबंधक अधिनियम १९८४ अन्वये पोलीस स्टेशन मौदा येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रमीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ, डॉ. संतोष गायकवाड उपविभागिय पोलीस अधीकारी कन्हान विभाग यांचे मार्गदर्शनाखाली सतिशसिंह राजपुत वरिष्ठ पोलिस निरीक्षक पोलीस ठाणे मौदा, सहायक पोलीस निरीक्षक मनोज चौधरी, पोलीस हवालदार राजेंद्र गौतम, पोना अजय वाघमारे, पोलीस अंमलदार अतुल निंबार्ते, शुभम ईश्वरकर, आशिष रडके पोलीस ठाणे मौदा नागपूर ग्रामीण यांनी केली.