मौदा :-पोस्टे मौदा येथील स्टाफ पो. स्टे. हद्दीत अवैध रेती वाहतूकीस आळा घालणेकरिता पेट्रोलिंग करीत असताना भंडारा ते नागपूर NH-53 रोडवर टिप्पर क्र. MH-40/BL- 1000 हा येताना दिसल्याने बोरगाव शिवारातील महादुला फाट्याजवळ नाकाबंदी दरम्यान टिप्परला थांबवून पाहणी केली असता १० चाकी टिप्पर क्र. MH-40/BL-1000 मध्ये अंदाजे ६ ब्रास रेती मिळून आल्याने सदर ट्रक चालकास ट्रक मधील रेतीचे रॉयल्टी चावत विचारले असता त्यांनी रॉयल्टी नसल्याचे सांगून ट्रक मालकाचे सांगण्यावरून भंडारा येथील रेती पाटातून आणल्याचे सांगितले. सदरची रेती ही चोरीची असल्याची खात्री झाल्याने आरोपीच्या ताब्यातून टिप्पर क्र. MH-40/BL-1000 किं, रु. २०,००,०००/- व त्यामधील ६ ब्रास रेती किं. रु. ३०,०००/- तसेच आरोपीचा मोवाईल फोन किंमती १०,०००/- असा एकूण रु. २०,४०,०००/- चा मुद्देमाल जप्त करून टिप्पर चालक नामे सूरदास बल्लू केवट, वय ३२ वर्ष, क्लीनर सूरज अमृत गोटेफोडे, वय २४ वर्ष दोन्ही रा. रोहा ता. मोहाडी जि. भंडारा तसेच ट्रक मालक विश्वनाथ वासुदेव बांडेवूचे रा. मोहाडी जि. भंडारा यांचे विरुद्ध पोस्टे मौदा येथे कलम ३७९, १०९, ३४ भा. द. वी. सहकलम ४८ (७), ४८(८) महा. ज. म. स. सहकलम ४,२१, खाणी आणि खनिजे अधी. १९५७ सहकलम ३ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक अधि. १९८४ अन्वये पो. स्टे. मौदा येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ, उपविभागीय पो. अधिकारी कामठी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार पोलीस निरीक्षक सतीशसिंह राजपूत, पोलीस उपनिरीक्षक महेश बोधले, पोलीस हवालदार संदीप कडू, गणेश मुदमाळी, रुपेश महादुले, पोलीस नायक दिपक दरोडे, चालक सहायक फौजदार कोठे, पोलीस अंमलदार रोशन तागडे यांनी केलेली आहे.