‘आयुष्यमान भारत ‘कार्ड असेल तरच मिळणार पाच लाख रुपयापर्यंतचा मोफत उपचार

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचा अंतर्भाव करून आयूष्यमान भारत योजना राबविली जात आहे या योजने अंतर्गतच्या रुग्णांना पाच लक्ष रुपया पर्यंतच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून एकूण 1209 उपचार/शस्त्रक्रिया मोफत दिले जाणार आहेत. कामठी तालुक्यात आयुष्यमान भारत कार्ड योजनेचा लाभ मिळू शकणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या हजारोच्या वर आहेत.

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे लाभार्थी हे सन 2011 साली झालेल्या सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणना च्या आधारावर असून या यादीत नाव असणारे व्यक्ती या योजनेचे पात्र लाभार्थी आहेत.आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा लाभ घेण्याकरिता आयुष्यमान कार्ड ची आवश्यकता आहे. हे कार्ड सि.एस.सी .केंद्र ,आपले सरकार केंद्र तसेच योजने अंतर्गत रुग्णालयात मोफत वितरित करण्यात येतात.त्याचप्रमाणे ही यादी गावनिहाय किंवा वार्डनिहाय लिंक वर सुद्धा नागरिक पाहू शकतात.त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजने अंतर्गत केशरी,पिवळे ,अंत्योदय आणि अन्नपूर्णा राशनकार्डधारक कुटुंबे पात्र लाभार्थी असून यात एकूण 996 उपचार/शस्त्रक्रियेकरिता प्रति वर्ष /प्रति कुटुंब दीड लाख रुपयांचा आरोग्य विमा पुरविण्यात येत आहे तर महात्मा जनआरोग्य योजने अंतर्गत दीड लक्ष आणि आयुष्यमान भारत योजने अंतर्गत साडे तीन लाख रुपये असे एकूण पाच लाख रुपया पर्यंतचे उपचार आरोग्य विभागाच्या माध्यमातून मोफत होतात.त्यामुळे उपचारापूर्वी आपले नाव आयुष्यमान भारत योजनेत समाविष्ट आहे का?याची खात्री करणे आवश्यक आहे.

@ फाईल फोटो

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com