अवैध रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल, वाहनासह एकूण २०,२१,०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त

– पोलीस स्टेशन कुहीची कारवाई

कूही :- पोलीस स्टेशन कुही हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारांकडुन माहिती मिळाली की, मौजा खापरी फाटा नागपूर उमरेड रोड वरून रेतीची चोरटी वाहतुक टिप्पर वाहनाने होत आहे. अशा मिळालेल्या माहितीवरून मौजा खापरी फाटा नागपूर उमरेड रोड वर नाकाबंदी करून यातील टिप्पर क्र. एम. एच. ४० वि.जी. ३९०९ चे चालकाने विनापरवाना अवैधरीत्या आपल्या ताब्यातील टिप्परमध्ये रेती भरून रेतीची चोरटी वाहतुक करतांना मिळून आल्याने टिप्पर क्र. एम. एच. ४० बि.जी.- ३९०९ एकुण किंमती अंदाजे २०,००,००० /- रू मध्ये एकुण ०७ ब्रास रेती किमती अंदाजे २१,०००/- रूपयाचा मुद्द्देमाल असा एकुण २०,२१,०००/- रूपयाचा मुद्देमाल मिळुन आल्याने पोलीस स्टेशन कुही येथे टिप्पर चालक मालक आरोपी नामे- स्वप्नील देविदास मोहोनकर, वय २४ वर्ष, रा. उमरेड ता. उमरेड जि. नागपूर यांचे विरूद्ध कलम ३७९ भादवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला असुन पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

सदरची कारवाई विशाल आनंद पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीण, डॉ. संदिप पखाले अपर पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीण यांचे मार्गदर्शनात परि सहायक पोलीस अधीक्षक तथा थाणेदार पोलीस स्टेशन कुही अनिल म्हस्के, सहायक पोलीस निरीक्षक नितेश डोलीकर, सहायक फौजदार प्रमोद बन्सोड, क्रिष्णा चुटके, पोलीस शिपाई विकेश राउत, रविंद्र मारवते यांनी केली आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गुरूंवर अर्थव्यवस्था मजबूत करणारे विद्यार्थी घडविण्याची जबाबदारी - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Fri Jul 7 , 2023
– शिक्षण मंचातर्फे गुरुवंदना व सत्कार समारोह नागपूर :- विद्यार्थी विकासाची भूमिका एक मिशन म्हणून हाती घेण्याची आणि अर्थव्यवस्था मजबूत करणारे विद्यार्थी घडविण्याची जबाबादारी गुरूंवर आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी (गुरुवार) केले. अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ संलग्नित विद्यापीठ शिक्षण मंचाच्या वतीने गुरुवंदना तसेच सत्कार समारोहाचे आयोजन करण्यात आले. रेशीमबाग येथील कवीवर्य सुरेश […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com