– नागपूर ग्रामीण पोलीसांची कारवाई
भिवापूर :- पो. स्टे. भिवापूर हद्दीत स्टाफसह पेट्रोलिंग करीत असताना नीलज फाटा ते भिवापूर रोडने १० चक्का टिप्पर ट्रक क्र. MH-49/AT-2387 हा येतांना दिसला त्याचा पाठलाग करून समर्थ पेट्रोल पंप समोर थांबवून पाहणी केली असता त्यामध्ये अंदाजे ०५ ब्रास रेती मिळून आल्याने सदर टूक चालकास ट्रक मधील रेतीचे रॉयल्टी बाबत विचारले असता त्याने रॉयल्टी नसल्याचे सांगितल्याने व सदरची रेती ही चोरीची असल्याची खात्री झाल्याने आरोपीतांकडुन टिप्पर ट्रक क्र. MH-49/AT-2387 किंमती २५,००,०००/-रु. व त्यामध्ये ०५ ग्रास रेती किंमती २५,०००/- रू. असा एकूण २५,२५,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त करून सदर टिप्पर चालक नामे लालचंद सोनबा नखाते, वय २३ वर्ष, रा. पाचरी ता. पवनी जि. भंडारा व मालक नामे- दिनेश सावरबांचे, रा. आसगाव यांचेविरुद्ध कलम ३७९, १०९ भा. द. वी. सहकलम ४८ (७), ४८(८) महा. ज. म. स. सहकलम ४, २१ खाणी आणि खनिजे अधी. १९५७ सहकलम ३ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक अभि.१९८४ अन्वये पो. स्टे. भिवापूर येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर प्रमीण हर्ष ए. पोहार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी उमरेड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद चौधरी, पी.एस.आय, सदमेक, परी, पोलीस उपनिरीक्षक किरण महागावे, पोलीस अंमलदार मिलिंद राठोड, रवी वानखेडे, पोलीस अंमलदार निकेश आरिकर यांनी केली.