सतरा वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या उंटखाना परिसर रहिवासी 17 वर्षीय मुली सोबत लग्न करण्याची बळजबरी करून तिला अश्लील शिवीगाळ देत तिच्या आईला मारझोड करून जीवे मारण्याची धमकी देण्याची घटना गतरात्री 8 दरम्यान उंटखाना येथे घडली असून यासंदर्भात पीडित तरुणीने स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारिवरून आरोपी रजीक खान रियाज खान वय 22 वर्षे रा उंटखाना कामठी विरुद्ध भादवी कलम 294,506 (बी)323,354(डी),336,341 सहकलम 11(4)पोक्सो कायद्यांनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर पीडित तरुणी व आरोपी एकाच वस्तीत शेजारी राहत असून एकमेकांशी चांगलेच परिचित असून इन्सट्राग्रामवर बोलणे सुद्धा सुरू होते मात्र मधातच दोघात झालेल्या मतभेदातून बोलणे बंद झाल्यामुळे सदर आरोपी तरुणाने पीडित तरुणीचा पाठलाग करून सोबत व लग्न करण्याची बळजबरी केली व माझ्यासोबत लग्न न केल्यास कुनालाच सोडणार नाही अशी धमकी देत सदर घटनास्थळी तारीख व वेळी फिर्यादी तरुणी व तिच्या आईला लाथभुक्कीने मारहाण केली यासंदर्भात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सूरु आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आरोग्य, स्वच्छता, पाणी, वीज, परिवहन सर्व सुविधा सुसज्ज करा - मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी

Wed Oct 11 , 2023
– धम्मचक्र प्रवर्तन दिन व्यवस्थेचा आढावा नागपूर :- धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगाने दीक्षाभूमीवर येणा-या लाखो बौद्ध अनुयायांच्या कुठल्याही प्रकारे गैरसोय होउ नये यादृष्टीने आरोग्य, स्वच्छता, पाणी, वीज, परिवहन यासह सर्व सुविधा सुसज्ज करा, असे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4 धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी नागपूर महानगरपालिका द्वारे करण्यात येत असलेल्या व्यवस्थेचा मंगळवारी (ता.१०) मनपा आयुक्त तथा प्रशासक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com