संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- श्रीसाई प्रसाद काॅलेज आँफ आर्ट्स सालवा येथील काॅलेज च्या मुलीशी छेडछाड करण्याऱ्या आरोपी विरुद्ध पोलीसांनी गुन्हा दाखल करून त्यास अटक केली.
प्राप्त माहिती नुसार सोमवार (दि.४) डिसेंबर ला सकाळी ९ ते १० वाजता दरम्यान पीडित मुलगी आपल्या चार मैत्रीणी सोबत कॉलेज ला जात असता कॉलेज गेट सामोर बाईकवर एक मुलगा सुनिल माहुरे वय २७ वर्ष रा. निमखेडा हा बसला होता. सुनिल ने पीड़ित मुलीला आवाज देवुन आपल्या जवळ बोलविले तेव्हा त्यास मुलीने विचारले की ” मला बोलवत आहे का ?” सुनिल म्हणाला मी तुला बोलवत आहे. या वरून मुलगी त्याचा जवळ मैत्रीणी सोबत गेली. तेव्हा सुनिल म्हणाला की, येथे हॉटेल, लॉज आहे का ? मला माझ्या मैत्रीणी सोबत जायचे आहे. तेव्हा मुलीने त्यास म्हटले की भैया यहा हॉटेल नही है, कन्हान मे हॉटेल मिलेंगे असे सांगुन मुलगी वापस कॉलेज कडे जात असतांना त्याने मुलीला हात मिळविण्यास म्हटले असता मुलीने त्याला म्हटले की, मी हात मिळवत नाही. असे म्हणुन मुलगी कॉलेज कडे जात असतांना सुनिल ने म्हटले की तु मला किस देते का ? यावरून मुलीने व तिच्या मैत्रीणी ने म्हटले की भग येथुन तेव्हा त्याने म्हटले की तुम्ही चारही मैत्रीण मला किस देता का असे म्हटल्याने मुलीनी त्यास ओरडुन तेथुन निघुन जा म्हणुन कॉलेज च्या आत गेल्या. सोमवार (दि.११ ) डिसेंबर ला चारही मैत्रीण सकाळी ९.३० ते १० वाजता दरम्या न निलज वरून कॉलेज ला पायदळ जात असताना आरोपी सुनिल आपल्या दुचाकी वाहन क्र.एम एच ४० सीजी ९३४० वर आला व तो मुलीला म्हणाला की मी तुला कॉलेज ला सोडुन देतो, तो तोच मुलगा होता ज्याने या अगोदर मुलीला छेडछाड केले होते. त्यास पकडायचे होते म्हणुन मुलगी व तिची मैत्रीण सुनिल च्या दुचाकीवर बसले व कॉलेज ला सोडुन मागितले. सुनिल ने कॉलेज जवळ थांबवुन मुलीला व तिच्या मैत्रीणी ला उतरवुन दिले व मुलीने त्याचा दुचाकी वाहनाची चाबी काढत असतांना सुनिल ने तिचा हात पकडुन दाबला व मुलगी ओरडल्याने सुनिल तिथुन पळुन गेला. या घटनेमुळे मुलगी आणि तिच्या मैत्रीणी खुप घाबरल्याने त्यांनी आपल्या घरी कोणालाही काही ही न सांगता कॉलेजच्या सुप्रिया पेंढारी व मोटघरे सर यांना सांगितले व त्यांनी मुलीला धीर दिल्याने बुधवार (दि.२७) डिसेंबर ला मुलीने पोलीस स्टेशन गाठुन आरोपी सुनिल माहुरे याचा विरुद्ध तक्रार दिल्याने पोलीसांनी त्यास अटक करुन त्याचे विरुद्ध अप क्र. ७९९/२३ कलम ३५४, ३५४ (डी), ३५४ (ए) भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांचा मार्गदर्शनात उपनिरिक्षक सीमा बेंद्रे हे करित आहे.