नागपूर :- पोलीस ठाणे नंदनवन १९ सि वृंदावन नगर नंदनवन कॉलोनी मागे राहणारे फिर्यादी हितेन्द्र नानाजी दोडके वय ४७ वर्षे, हे घरी हजर असता, त्यांना अनोळखी आरोपीने व्हॉट्ॲप वरून फिर्यादीस punctual stages part time job या ग्रुपवर अज्ञात अंडमीन याने जॉईन केले व व्हाट्सअँप मॅसेज करून युट्युब चैनल सबस्काइब करण्यासाठी सांगुन त्या बदल्यात आर्थिक मोबदला देण्याचा ऑफर दिला. तसेच ईतर टास्क पूर्ण केल्यास आर्थिक आमीष दाखविले. फिर्यादी यांनी टास्क पुर्ण केले. आरोपीने फिर्यादीस फायदा देवून रक्कम परत दिली व फिर्यादीस फायदा होत असल्याने दर्शविले. आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. आरोपीने फिर्यादीस गुंतवणुक केल्यास चांगले रिफंड देण्याचे आमीष दाखवुन फिर्यादीचे बँकेचे वेगवेगळया खात्यातून वेळोवेळी वेगवेगळया खात्यात एकूण २७,७०,०५०/- रु. ऑनलाईन घेतले.. व कोणताही फायदा न देता, कोणतीही रक्कम परत दिली नाही, फिर्यादीस त्यांची फसवणुक झाल्याचे लक्षात आले. आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन करून रक्कम घेवून फिर्यादीचा विश्वासघात करून ऑनलाईन आर्थिक फसवणुक केली. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरून पोलीस ठाणे सायबर येथे सपोनि बागुल यांनी आरोपीविरुद्ध कलम ४२०, भा.दं.वि. सहकलम ६६(४) आयटी अॅक्ट अन्वये गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध घेत आहे. पुढील तपास सुरू आहे.
फसवणुक करणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com