फसवणुक करणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल

नागपूर :- पोलीस ठाणे सक्करदरा हद्दीतीत राहणारे फिर्यादी अभिषेक विष्णुगोपाल जयस्वाल, वय ४० वर्ष, रा. प्लॉट नं. ६/३७, रघुजी नगर, सक्करदरा, नागपूर यांचे न्यु अभिषेक ट्रेडोंग कंपनीचे कार्यालय असून, त्यामध्ये फॉरच्यूनचे खाद्य तेल व निरमा पावडरची एजन्सी आहे. दिनांक १८.०५.२०२४ चे ११.०० वा. चे सुमारास आरोपी विनोद भगवानदास कल्याणी, वय ४५ वर्ष, रा. घर नं. १३३, जुना भंडारा रोड, नागपूर यांनी फिर्यादीचे दुकानात फोन करून सिध्दीविनायक ट्रेडर्स मधुन बोलत आहे मला १५ किलो किंग सोयाबिन तेलाचे ४० डब्बे ऑर्डर वाचत बोलणी करून फिर्यादीचा विश्वास संपादन करून ४० तेलाचे डब्याची ऑर्डर देवुन फिर्यादीस चेक देवुन ४० तेलाचे डब्बे गाडी पाठवुन घेवुन गेला होता. तसेच आरोपीने पुन्हा ४० तेलाचे डब्याची ऑर्डर देवुन एस. बी. आय बँकेचा चेक दिला, नमुद दोन्ही चेक फिर्यादीने बँकेत लावला असता दोन्ही चेक बाऊंस झाले, आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन करून फिर्यादीची एकुण १,३५,२००/- रू. आर्थिक फसवणुक केली.

याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तकारीवरून व अर्ज चौकशीवरून पोलीस ठाणे सक्करदरा येथे मसपोनि नेरकर यांनी आरोपीविरूध्द कलम ४०६, ४२० भा.दं. वो अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

रामटेक विधानसभेची संवेदना असलेला स्थानिक उमेदवार देण्यात यावा - रामटेक विधानसभेसाठी प्रकाश जाधव यांची पक्ष श्रेष्टी कडे मागणी

Sat Sep 28 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कन्हान :- येथील स्थानिक, नागपुर जिल्हयात शिवसेनेचे पायमुळ घट करणारे सर्वसामान्याना न्याय मिळवुन देण्याकरिता अनेक आंदोलने करून जनमानसात शिवसेना पोहचविणारे, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष पद भुषविणारे, तेविस महिने रामटेक लोकसभेचे सदस्य राहुन पक्षाने दिलेली सर्व जवाबदारी निष्ठेने पार पाडणारे, रामटेकचा खुंटलेला विकास करण्याकरिता कर्तव्यदक्ष आणि रामटेक विधानसभेची संवेदना असलेले एकमेव प्रकाश जाधव यांनाच शिवसेना (उबाठा) पक्षाची उमेदवारी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!