पोलीस ठाणे शांतीनगर:- दिनांक ०९.०४.२०१३ चे १५.२६ वा. ते १०.०४.२०२३ चे १०.०० वा. चे सुमारास फिर्यादी मोहम्मद साकीब मोहम्मद युनुस मेमन वय ३९ वर्ष रा. अस्लम बिल्डींग, प्लॉट नं. ४०१ मुदलीयार चौक, पोलीस ठाणे शांतीनगर हे आपले घरी हजर असतांना त्यांना आरोपी मोबाईल क्र. ११८२५३४९८१ चा धारक याने मेसेज व फोन करून तो एच. आर डीजीटल मॉकेटींग एजेन्सी येथून बोलत आहे असे सांगुन फिर्यादीला नविन पोजेक्ट चालू होत आहे. त्या मध्ये दिलेले टास्क प्रमाणे त्यांचे यु टयुब चॅनलला सबस्काइब केल्यास एका चॅनेलचे १५०/- रु. देण्याचे आमिष दाखविले व फिर्यादीचे बँक खात्याची माहीती घेवुन फिर्यादीस वारंवार ऑनलाईन पैसे भरण्यास सांगुन फिर्यादीची एकूण ३,९३,५००/- ऑनलाइन फसवणुक केली. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तकारी वरून व अर्ज चौकशीवरून पोलीस ठाणे शांतीनगर येथे पोउपनि पवार यांनी वर नमुद मोबाईल धारकाविरुद्ध कलम ४१९, ४२०, भा.दं.वि. सहकलम ६६ (डी) माहीती तंत्रज्ञान कायदा अन्वये गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध घेत आहे. पुढील तपास सुरू आहे.
फसवणुक करणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com