नागपूर :-अनिरुद्ध लक्ष्मीनारायण शर्मा वय ३३ वर्ष रा. प्लॉट नं. ७२ अव्दैतम लेडी पार्क रामदापेठ, सिताबर्डी, नागपूर यांचे युगधर्म कॉम्प्लेक्स पाचवा माळा, सेंट्रल बाजार रोड, सिताबर्डी येथे पवनसुत ट्रॅव्हल्स प्रायवेट एजन्सी नावाने ऑफीस असुन त्या ठिकाणी सर्व एअर लाईन्सचे टिकीट काढले जातात तसेच अंतरराष्ट्रीय टूरचे आयोजन केले जाते. कोणीतरी अज्ञात आरोपीने फिर्यादीचे ट्रॅव्हल्स एजन्सीचे इंडिगो एअर लाईन्सचे लॉगीन आयडी व पासवर्ड चोरून ११ अज्ञात प्रवाशांना टिकट उपलब्ध करून देवून आरोपीने फिर्यादीची एकुण ५,०४,५९६/- रुची आर्थिक फसवणुक केली.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे सायबर येथे मसपोनि बांबे यांनी आरोपीविरूद्ध कलम ४२० भा.दं.वि सहकलम ४३, ६६ (क) आयटी अॅक्ट अन्वये गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध घेत आहे. पुढील तपास सुरू आहे