नागपूर :- पोलीस ठाणे जरीपटका हद्दीत ब्लॉक नं. ५४ हेमु कॉलोनी, जरीपटका येथे राहणाऱ्या फिर्यादी अनिता अशोक मोरयानी वय ३५ वर्षे यांनी सन २०१९ मध्ये त्यांचे आईची प्रकृती खराब असल्याने त्यांचे मामाचा मुलगा नमय नरेश दुधानी वय २१ वर्ष रा. भोपाल यास देखरेखी करीता बोलाविले होते. तो संपूर्ण कामे पाहत असल्याने फिर्यादीचा त्यांचेवर विश्वास होता. आईचे मृत्यू नंतर फिर्यादीचे सर्व आर्थिक व्यवहार तोच पाहत होता. त्याचे कडे सर्व माहिती होती. आरोपी तन्मय दुधानी याने फिर्यादीच्या विश्वासाचा फायदा घेवून फिर्यादी व तिचे वडीलांनी जमा केलेली रक्कम स्वतः चे नावाने अॅक्सीस बँकेत खाते उघडून त्या मध्ये जमा केली. तसेच त्याने फिर्यादी व तिचे आई व वहिनीचे वडीलोपार्जीत दागिने स्वतःचे लॉकर मध्ये ठेवण्या करीता घेवुन फिर्यादीस परत केले नाही. आरोपीने फिर्यादीचे बँकेतील एफ. डी घर लोन घेवून एफडी सुध्दा फिर्यादीच्या खोटी सहया करून फॉर क्लोज केली. आरोपीने फिर्यादी कडुन व तिचे वडीलांचे रोख १,६९,२१,०००/- रू तसेच सोन्या-चांदीचे दागिने किमती ७२,००,०००/- रू चे असा एकुण २,४१,२१,०००/- चा मुद्देमाल फिर्यादीचा अन्यायाने विश्वासघात करून फिर्यादी कडुन घेवून फिर्यादीची आर्थिक फसवणुक केली. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून व अर्ज चौकशीवरून पो. ठाणे जरीपटका येथे मपोउपनि काळे यांनी आरोपीविरुद्ध कलम ४२०, ४०६ ४६७ ४६८ भादवि. अन्वये गुन्हा नोंदवुन पुढील तपास सुरु आहे.
फसवणुक करणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com