नागपूर:- दिनांक २५.०६.२०२३ चे १२.२५ वा. ते दि. ०५.०७.२०२३ चे ११.०० वा. चे दरम्यान पोलीस ठाणे मानकापूर हदीत प्लॉट न. ६०, ढोरे ले आउट, येथे राहणाऱ्या फिर्यादी निकीता प्रभाकर मेहकारकर वय २६ वर्षे, हया आयटी डेवलपर्स म्हणून काम करतात, घरी हजर असतांना त्यांना अनोळखी आरोपीने मोबाईल क. ९११२० ३१२७२८८ यावरून कॉल करून फिर्यादीस पार्ट टाइम जॉब ऑफर केला व टास्क देवुन टास्क पुर्ण केल्यास आर्थिक आमीष दाखविले. फिर्यादी यांनी टास्क पूर्ण केले. आरोपीने फिर्यादीस फायदा देवून रक्कम परत दिली. व फिर्यादीस फायदा होत असल्याचे दर्शविले. आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. आरोपीने फिर्यादीस गुंतवणुक केल्यास चांगले रिफंड देण्याचे आमीष दाखविले व लिंक पाठवुन अकाउंट उघडण्यास सांगीतले. आरोपीने फिर्यादीचे बँकेचे विवरण घेवुन वेगवेगळ्या खात्यातून वेळोवेळी वेगवेगळया खात्यात एकुण ११,३२,०००/- रु. ची गुंतवणुक करण्यास भाग पाडले व कोणताही फायदा न देता, कोणतीही रक्कम परत दिली नाही. फिर्यादीस त्यांची फसवणूक झाल्याने लक्षात आले. आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन करून रक्कम घेऊन फिर्यादीचा विश्वासघात करून ऑनलाइन आर्थिक फसवणुक केली.