नागपूर :- पोलीस ठाणे बजाजनगर हद्दीत पि अँड टी कॉलनी, प्लॉ. नं. ८७, नागपूर येथे राहणाऱ्या फिर्यादी निरुपमा नरेंद्र सिंग वय ७० वर्ष हया हळदी कुंकवाचे कार्यक्रमाकरीता पायदळ घराजवळ जात असता नं. ८५ चांद्रायण यांचे घरासमोर फिर्यादी यांना एका इसमाने थांबवुन स्वतःला पोलीस असल्याची बतावणी करून तुम्हाला आमचे साहेब बोलावित आहे असे म्हणून बाजुला असलेल्या तोतया साथीदाराकडे घेवुन गेला. आरोपींनी संगणमत करून फिर्यादीस आताच काही वेळापूर्वी चैन संचांग झालेली आहे. तुम्ही सोने घालून का फिरता असे म्हणून फिर्यादीस घातलेले सोने काढुन बँगेत ठेवायला सांगीतले व बहाण्याने सोने आपल्याजवळ घेवुन बॅगेत टाकल्याचे नाटक करून तेथून निघुन गेले. फिर्यादी यांनी त्यांचे मैत्रीणीचे घरी जावून बॅगेत पाहिले असता फिर्यादीचे सोन्याचे दागीने चैन, बांगड्या दिसुन आल्या नाही, तोतया आरोपींनी संगणमत करून फिर्यादीचे दागीने एकूण किंमती ४,९४,०००/- मुद्देमाल फसवणुक करून घेवुन गेले.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे बजाजनगर येथे मपोउपनि काटोले यांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ४१९, ४२०, ४०६, १७०, ३४ भा.दं.वि अन्वये गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध घेत आहे. पुढील तपास सुरू आहे.
आवाहन
नागरिकांना आवाहन करण्यात येते की, वरील प्रकारे नागरिकांना रस्त्यात थांबवुन पोलीस असल्याची बतावणी करणारे ईसमांपासुन सावध रहावे अशा प्रकारे कोणी थांबवित असल्यास व दागीने काढण्यास सांगुन रूमालात, कागदात बांधण्यास सांगीत असल्यास त्यांचेकडे दुर्लक्ष करून, तेथे न थांबता त्यांना कोणतेही दागीने देवु नये व काही संशय असल्यास जवळील पोलीस ठाणेस किंवा नियंत्रण कक्ष, डायल १९२ येथे संपर्क करावा