कन्हान :- अंतर्गत ०२ किमी अंतरावर साई नगरी हिवरा रोड कन्हान येथे दिनांक ०१/०७/२००४ ते २७/०७/२०२२ सुमारास फिर्यादी नामे- विलास पांडुरंग खोब्रागडे वय ४३ वर्ष, रा. साई नगरी हिवरा रोड कन्हान हे साई नगरी हिवरा रोड कन्हान येथील रहीवासी असुन यातील आरोपी नामे १) अजय शेंद्रे, २) अविनाश शेंन्द्रे ३) सुमन शेंद्रे सर्व रा. संताजी नगर कन्हान हे साई नगरी येथील मालक आहेत या आरोपीतांनी संगणमत करून साई नगरी येथील जुन्या नकाशात सार्वजनिक उपयोगीता क्षेत्र दर्शविलेल्या ठिकाणाचे नवीन खोटया नकाशात प्लॉट आखुन ईतर लोकांना विकुन देवून फिर्यादीची फसवणुक केली आहे..
सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. कन्हान येथे आरोपीविरुध्द कलम ४२०, ४०६, ४३८,४६६, ४७१, १२०, ३४ भा.द.वी कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. गुन्हयाचा पुढील तपास सपोनि. फुलझेले मो. क्र. ९४०४१२३९५० हे करीत आहे.