प्राणांतीक अपघात करणाऱ्या आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल

नागपूर :- फिर्यादी नामे अजय रामचंद्र कवीमंडन, वय ६४ वर्षे, रा. प्लॉट नं. १३, पन्नासे कॉलोनी, आयटी पार्क रोड, प्रतापनगर, नागपूर हे त्यांचे अॅक्टीव्हा दुचाकी क. एम.एच ३१ ई. एक्स ०४३५ ने त्यांची नातीन नामे कु. पृथा आकाश पडि, वय १० वर्ष, हिला डान्स क्लास करीता, ऑरेंज सिटी चौक, येथे सोडण्याकरीता मागे बसवुन गोपाल नगर कडुन पडोळे चौकाकडे जात असता, एका अज्ञात चार चाकी माल वाहन टेम्पो चालकाने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे बालवुन फिर्यादीचे अॅक्टीव्हा गाडीला मागुन बडक दिल्याने फिर्यादीची नातीन कु. पृथा ही खाली रोडवर पडली व तिचे डोक्याला मार लागुन गंभीर जखमी झाली. फिर्यादीस किरकोळ मार लागला, टेम्पो वाहन चालक अपघात करून पळुन गेला. लोकांनी गंभीर जखमी मुलीला उपचाराकरीता ऑरेंज सिटी हॉस्पीटल येथे नेले असता, डॉक्टरांनी मुलीला तपासून मृत घोषीत केले.

याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तकारीवरून पोलीस ठाणे प्रतापनगर येथे सपोनि. कदम यांनी अज्ञात टेम्पो वाहन आरोपीविरूध्द कलम २८१, १०६(१) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करून, पुढील तपास करीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दलित महिला सरपंचावर अन्याय करणाऱ्या महायुती सरकार विरोधात एक दिवसीय धरणा आंदोलन.

Thu Oct 10 , 2024
  संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 9:- नागपूर जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत मानल्या जाणाऱ्या येरखेडा ग्रा प वर कांग्रेस प्रणित पॅनल ची सत्ता स्थापित असून सरपंच पदी दलित महिला सरिता रंगारी विराजमान होत येरखेडा ग्रा प चे नेतृत्व सांभाळत आहे पण ही बाब विरोधक असलेल्या भाजप प्रणित पॅनल ला पचविण्यासारखे होत नसल्याने अवघ्या काही महिन्यातच विरोधकांनी दूषित राजकारण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com