प्राणांतिक अपघात करणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल

नागपूर :-दिनांक १४.०२.२०२४ ने ००.३० वा. चे सुमारास, फिर्यादीचा भाचा नामे नोएल अविनाश पंडित, वय २३ वर्षे, रा. प्लॉट नं. ९१, गंगा-सोना अपार्टमेंट, हुडकेश्वर, नागपूर हा त्याचे यामाहा मोटरसायकल क. एम.एच ३५ बी. ५२९९ ने घरी जात असता मानेवाडा चौक ते उदय नगर चौक, रिंग रोडवर, तपस्या विद्यालय चौका जवळ त्याचे मोटरसायकलला अज्ञात चारचाकी वाहनाचे आरोपी चालकाने त्याचे ताब्यातील वाहन हयगयीने व निष्काळजीपणे चालवुन, फिर्यादीचे भाच्याचे मोटरसायकलला कट मारल्याने, मोटरसायकल स्लीप होवुन फिर्यादीचा भाचा गंभीर जख्मी झाला, गंभीर जखमी यांना उपचारकामी मेडीकल हॉस्पीटल येथे नेले असता, डॉक्टरांनी फिर्यादीचे भाच्याला तपासुन मृत घोषीत केले.

याप्रकरणी फिर्यादी सुनिल जॉन रमेश जॉन वय ५५ वर्ग रा. नेकोसाबाग, खिश्चन कॉलोनी, नागपूर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पो. ठाणे हुडकेश्वर येथे सफी जाधव यांनी आरोपी अज्ञात वाहन चालकाविरुध्द कलम २७९, ३०४(अ) भा.द.वि., सहकलम १३४, १७७ मो.वा. का, अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

फसवणुक करणाऱ्या आरोपीस अटक

Thu Feb 15 , 2024
नागपूर :-फिर्यादी बाबा टाटांबर गुरु दुर्गानंद वय ७२ वर्ष रा छिंदवाडा रोड सावेनर यांनी पोलीस स्टेशन सावनेर येथे दिनांक २१/१०/२०२१ रोजी रोपोर्ट दिली की, आरोपी मेहेर बाळकृष्ण परतेकी, वय ४३ वर्ष रा. किल्लापुरा सावनेर यांनी नागपुर निधी लि. या नावाने सावनेर शहरात बले कॉम्पलेक्स मध्ये सन २०१८ ला वित्तीय संस्था स्थापन केली होती व त्यामध्ये आरोपी व ईतर सहा लोक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com