नागपूर :- दि. १८.०८.२०२३ ०१.०० वा. चे दरम्यान गुन्हेशाखा युनिट चे अधिकारी व अमलदार हे पोलीस ठाणे अजनी हद्दीत, पेट्रोलींग करीत असतांना ओल्ड हॅबोट कॅफे ओंकार नगर, अजनी, नागपूर येथे, अवैध हुक्का पार्लर चालू आहे. अशा मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून, नमुद ठिकाणी रेड कारवाई केली असता, तेथे आरोपी क. १) नितीन दिनेश पाल वय ४० वर्ष रा. प्लॉट न. १३६८, पार्वती नगर गल्ली न. ८. अजनी, नागपूर २) अभिजीत नरविंद भगत वय २४ वर्ष रा. रामटेके नगर गल्ली न. ३ अजनी, नागपूर ३) मोहम्मद इमरान खान शेख अनवर वय २५ वर्ष रा. प्लॉट न. ९० ताजनगर गल्ली न. १ अजनी, नागपूर हे शासनाने प्रतीबंधीत केलेला सुंगधीत तंबाखु, व तांबाखु जन्य पदार्थ व वेगवेगळा फ्लेवरचे तंबाखु हुक्का इत्यादी साहित्य ग्राहकांना पुरवून विक्री करतांना मिळून आले. आरोपींचे ताब्यातून १२ नग हुक्का पॉट, विवीध फ्लेवर तंबाखु, इतर साहित्य असा एकूण ६९,९३८/- रू चा मुद्देमाल मिळून आल्याने जप्त करण्यात आलेला आहे. आरोपीविरुध्द पोलीस ठाणे अजनी येथे कलम ४(२१) सिगारेट आणि ईतर तंबाखु उत्पादने (जाहीरातीस प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य, व्यवहार आणि उत्पादन, पुरवठा व वितरन यांचे विनीयमन) अधिनीयम २००३ अन्वये गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
वरील कामगिरी अपर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा, पोलीस उप-आयुक्त (डिटेक्शन) यांचे मार्गदर्शना खाली पोनि शाम सोनटक्के, पोउपनि अविनाश जायभाये, निरंजना उमाळे, पोहवा सुनिल ठक्कर, नापोअ देवेंद्र नवघरे, अतुल चाटे, पुरुषोत्तम काळमेघ, दिपक चोले, चेतन पाटील, नरेंद्र बांते, सत्येंद्र यादव यांनी केली.