भिवापूर:- पोस्टे भिवापूर येथील स्टाफ पोस्टे हद्दीत पेट्रोलींग करीत असता गोपनीय माहिती मिळाली की, एक इसम अॅक्टीवा स्कुटीने दारू घेवुन उमरेड वरून भिवापूर येथे येत आहे. अशी माहिती मिळाल्याने भिवापूर स्टाफ यांनी नमुद घटनास्थळी नाकाबंदी केली असता अॅक्टीवा (स्कुटी ५ जी) क्र. MH -49/BL-9341 ने अवैधरीत्या दारू वाहतूक करणारा इसमास नाकाबंदी केली असता आरोपी नामे मिलींद मोरेश्वर मेश्राम वय ३२ वर्ष रा मंगळवारी वार्ड उमरेड ता उमरेड जि. नागपुर यांच्या ताब्यातून विनापरवाना व अवैधरीत्या १) ०३ पेटी देशी दारू कोकणच्या प्रत्येकी पेटीमध्ये ४८ सिलबंद निपा प्रत्येकी १८० एम एल अशा एकूण १४४ निपा प्रत्येकी ७०/ रू प्रमाणे किंमती १०,०८०/-रू. चा माल व अॅक्टीवा (स्कुटी ५ जी) क. MH-49-BL-9341 किंमती ५०,०००/- असा एकुण ६०,०८०/- रू. मिळुन आला. यातील आरोपीस सुचनापत्रावर सोडण्यात आले आहे.
सदर प्रकरणी सरकारतर्फे फिर्यादी नामे मनोज यशवंत बाचेरे, पोस्टे भिवापुर यांचे रोपोर्ट वरून पोस्टे भिवापूर येथे आरोपीविरूद्ध कलम ६५ (अ) मदाका, अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे भिवापूर येथील ठाणेदार सपोनि, जयप्रकाश निर्मल, पोना रविंद्र जाधव, पोअं. मनोज चाचेरे, पोर्भ, दिपक ढोले, निकेश आरीकर यांनी पार पाडली.