रामटेक :-पोलीस ठाणे रामटेक गुन्हा रजि. क्र. ५७०/२४ कलम ३०३ (२), ३(५) भा.न्या.स. मधील फिर्यादी नामे सौरभ शंकर दिवटे वय २५ वर्ष रा. अडेगाव ता. मौदा है दि. १५/०८/२०२४ रोजी सायंकाळी ०७.३० वा. सुमारास आपले परिवारासह रामटेक शहरात आनंद मेला पाहण्याकरीता त्यांची काळया रंगाची पांढरे पट्टे असलेली स्प्लेंडर प्रो मोटार सायकल क्रमांक MH 40 AP 4975 किंमती २०,०००/- रू. ही उभी करून ठेवली होती सदर मोटार सायकल अज्ञात चोरांनी चोरून नेली होती. सदर गुन्ह्यात गोपनिय बातमीदाराकडून माहीती प्राप्त करून आरोपी नामे १) रोशन शंकर वाघाडे वय १९ वर्ष रा. खंडाळा ता. रामटेक २) निखील बाळकृष्ण चन्ने वय २१ वर्ष रा. काचुरवाही ता. रामटेक ३) प्रज्वल पचरू वैद्य वय १८ वर्ष रा. काचुरवाही ता. रामटेक यांना निष्पन्न करण्यात आले असुन सदर गुन्ह्यात तिनही आरोपीतांना दि. २६/०८/२०२४ रोजी अटक करून त्यांचे ताब्यातुन १) पांढरे पट्टे असलेली काळी स्प्लेंडर प्रो मोटरसायकल क्र. MH 40 AP 4975 किंमती रु. २०,०००/- रू. २) तसेच सदर गुन्हा करणेकरीता वापरलेली एक लाल रंगाची बजाज कंपनीची प्लॅटीना मोटार सायकल क्रमांक MH 40 T 1021 किंमती ३०,०००/- रू. एकुण किंमती ५०,०००/- रू. चा माल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कारवाई हर्ष पोद्दार पोलीस अधिक्षक, नागपूर ग्रामिण, रमेश धुमाळ, अपर पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामिण, रमेश बरकते, उपविभागिय पोलीस अधिकारी, रामटेक यांचे मार्गदर्शनात पोनि प्रशांत काळे, पोउपनि श्रीकांत लांजेवार, पोउपनि हरिवंद्र मोरे, पोहवा अमोल इंगोले, पोहवा गजानन माहुरे, पोना प्रफुल रंधई, पोना मंगेश सोनटक्के, पोशि शरद गिते, पोशि धिरज खते, पोशि योगेश कुयटे, चापोशि विशाल चव्हाण यांनी केली.