– यशोधरानगर पोलीसांची कामगिरी
नागपूर :-दिनांक २०.०७.२०१३ ला पो. ठाणे यशोधरानगर हृदींत, यशोधरानगर पोलीसांचे तपास पथक हे स्टॉफ सह गुन्हेगारांचे शोधात पेट्रोलींग करीत असताना, त्यांना गुप्तबातमीदारा मार्फत खात्रीशिर माहिती मिळाली की राजीव गांधी पुलीया येथून ऑटोमोटिव्ह चौकाकडे महिंद्रा कंपनीची पिकअप गाड़ी के एम.एच. ३३ जी. १२२४ यामध्ये अवैधरित्या गोवंश वाहतुक होत आहे. अश्या माहिती वरून यशोधरानगर पोलीसांनी सापळा रचुन नमुद वाहन दिसुन आल्याने त्याचा पाठलाग करून ऑटोमोटीव्ह चौकात थांबविले असता, आरोपी वाहन चालक हा वाहन सोडुन पळून गेला. वाहनाची पाहनी केली असता त्यामध्ये ११ गोवंश जातीचे जनावरे कोंबुन निर्दयतेने वाहतुक करून अवैधरित्या कत्तली करीता घेवून जात असल्याचे दिसुन आल्याने, सदर वाहन व ११ गोवंश जनावरे किमती अंदाजे ५,२०,०००/- रु. मुद्देमाल ताब्यात घेण्यात आले. आरोपीचे हे कृत्य कलम २७९ भादवी सहकलम ५ (क). (९), महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम सहकलम १२ (ई) (एफ)(एच) भा. प्रा. मि. वा. प्र. कायदा सहकलम ११९ मोका सहकलम ४७, ४८, ४९ प्राण्याचे परीवहन नियम सहकलम ८३ ९८४ ९७७ मोवा अन्वये गुन्हा नोंदवून पळुन गेलेल्या आरोपीचा शोध घेत आहे.
वरील कामगिरी पोलीस उपआयुक्त, परीमंडळ ०५ सपोआ जरीपटका विभाग यांचे मार्गदर्शना खाली पो.नि. ज्ञानेश्वर भेदोडकर, पोउपनि सचिन भालेराव, राम बारोले पोहवा श्याम कडु, पोअ रोहित रामटेके, नरेंद्र जांभुळकर, नारायण कोहचाडे, चंद्रकांत कटरे, सन्नी मतेल यांनी केली आहे.