– पोलीस स्टेशन मौदा नागपुर ग्रामीणची कारवाई
मौदा :- पोस्टे मौदा येथील पोलीस पथक पोलीस ठाणे परिसरात पेट्रोलींग करीत असताना आवंडी (भोवरी) शिवार परिसर येथे मुखवीरद्वारे खात्रीशीर माहिती मिळाली की, टाटा ट्रक क्र. एम. एच. ४०/वाय.-०९५१ मध्ये प्राण्यांना निर्दयतेने वागणूक देत चारा पाण्याची सोय न करता भंडारा येथून नागपूरकडे जनावरे नेत आहे. अशा विश्वसनिय खबरेवरून मौदा पोलीस स्टाफ यांनी आवंडी भोवरी शिवार येथे नाकाबंदी केली असता भंडारा कडून नागपूरकडे जाणारा टाटा ट्रक क्र. एम. एच. ४०/वाय-०९५१ येतांना दिसले. सदर वाहनाला थांबविले असता सदर ट्रक मध्ये असलेले ड्रयव्हरने ट्रक थांबवून खाली उतरून ट्रक सोडून अंधाराचा फायदा घेउन पळून गेला. त्याचा पोलीस स्टाफसह पाठलाग केला असता मिळून आला नाही. वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये ०१ लाल रंगाचा बैल किंमती १५,०००/-रू. २ काळया रंगाने बैल किंमती ३०,०००/-रु. १७ पढिन्या रंगाने बैल २,५५,०००/- रू असे एकूण ३,००,०००/- रू चे जनावरे ज्यांच्या मुसक्या आवळून वाहनाच्या पल्ल्याला जनावरांना हालचाल करता येणार नाही अशा पध्दतीने बांधून, त्यांना निर्दयतेने वागणुक देवून त्यांची कोणत्याही प्रकारची चारापाण्याची व्यवस्था न करता वाहनात पुरेसा श्वास घेता येणार नाही अशा प्रकारे आखूड दोरखंडाने बांबुन अवैधरित्या टाटा ट्रक क्र. एम. एच.- ४०/वाय- ०९५१ मध्ये फॉवून भरून कत्तलीकरिता घेवून जातांना मिळून आल्याने आरोपीच्या ताब्यातून टाटा ट्रक क्र. एम. एच. ४०/वाय- ०९५१ किंमती २०,००,०००/- रु. २० गोवंश किंमती ३,००,०००/-रू. असा एकूण २३,००,०००/- रु. चा मुद्देमाल जप्त करून जनावरे संरक्षणार्थ व संवर्धना करिता सुकृत गौशाला खैरी पिंपळगाळ, ता. लाखणी, जि. भंडारा येथे दाखल करण्यात आले. आरोपी टाटा ट्रक क्र. एम. एच.-४०/वाय-०९५१ च्या चालकाविरूद्ध कलम ११ (१) (घ) (ड) (ব) प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम १९६० सहकलम ९ प्राणी संरक्षण अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक नागपूर (ग्रामीण) हर्ष पोहार (भा.पो.से.) तसेच अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे मौदा येथील ठाणेदार पोलीस निरीक्षक पराग पोटे, पोलीस उपनिरीक्षक सचिन उरकुडे व पोलीस नायक तुपार कुडुपले, पोलीस अंमलदार शुभम ईश्वरकर, अतुल निंबारते यांनी केली.