जनावराची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल 

नरखेड :- पोलीस स्टेशन नरखेड अंतर्गत पोलीस चौकी सावरगाव हद्दीतील सावरगाव ते सोनोली रोड वर सोनोली शिवारात एक पिवळया रंगाची दस चक्का गाडी क्रमांक MP-09/HG 0325 मध्ये वाहन चालक याने जनावरे कोंबून नेत असल्याबाबतची माहिती मिळाल्याने, पोलीस स्टेशन नरखेड, वाहतूक शाखा ना. ग्रा. आणि पोलीस ठाणे काटोल येथील स्टॉफच्या मदतीने सदर ठिकाणी नाकाबंदी करून सदर वाहन थांबविले असता सदर वाहनाची पाहणी केली असता वाहना मध्ये एकूण ४४ बैल गोरे व एक मृत गोरा असे एकूण ४५ काळे पांढरे लाल रंगाचे गोरे मिळून आल्याने बैल गोरे यांना मालापूर तह नरखेड येथील गोवंश शाळा मध्ये ठेवले असून बैल गोरे यांचा उपचार सुरू आहे तसेच एक बैल गोरा यांचा उपचार सुरू आहे. वाहन चालका विरुद्ध पोलीस स्टेशन नरखेड येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणाऱ्या आरोपीला कोर्टातुन शिक्षा

Wed Jan 10 , 2024
कुही :- दिनांक ०९/०३/२०२० चे ०४/२३ वा. दरम्यान फिर्यादी नामे पोशि/८६९ देवेन्द्र विनायक बुटले पो.स्टे. कुही यांच्या रिपोर्ट वरुन पो.स्टे. कुही येथे १२०/२० कलम ३५३, ५०६ भादंवि, कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता. दिनांक ०९/०३/२०२० से ००/३० ते ०१/०० वा. दरम्यान यातील फिर्यादी हे पांचगाव चौकी येथे आपले कर्तव्यावर हजर असतांना फिर्यादीची तक्रार घेत असतांना आरोपी नामे सुरज धनराज खोब्रागडे वय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!