जनावरांची अवैधरीत्या वाहतुक करणाऱ्या आरोपीताविरूद्ध गुन्हा नोंद

– स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही

नागपूर :- दिनांक १०/०८/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कन्हान उपविभागात पेट्रोलिंग करीत असतांना मुखविरव्दारे ख़बर मिळाली की, पोलिस ठाणे मौदा हद्दीतून १० चक्का ट्रक क्र. MH-४० CD २२०२ या वाहनाने बेकायदेशीरपणे गोवंश यांना त्यांची चारा पाण्याची सोय न करता गाडीमध्ये कोंबून कतलीकरीता भंडारा येथून नागपूरकडे जात आहे. यावर स्टाफचे मदतीने मौजा माथनी टोलवर नाकाबंदी करून त्याला थांबविण्याचा ट्रक चालकास इशारा दिला असता न थांबता पळून गेला यावर सदर गाडीचा सरकारी वाहनाने पाठलाग केला असता सदर वाहन हे फरार आरोपी १० चक्का ट्रक क्र. MH-४०/ CD २२०२ या चालक व मालक नामे- फिरोज फारुख कुरेशी रा कामठी गुमथाळा हे बीज खाली वाहन उभे करून घटनास्थळाहून पळून गेले. सदर वाहनाची पाहणी केली असता त्यात १७ गोवंश जनावरे किंमती अंदाजे ०१ लाख ७० हजार रु. हे जनावरे कुर व निदर्यतेने वाहतुक करतांना मिळुन आले. घटनास्थळावरून एकूण १७ गोवंश जनावरे किंमती अंदाजे ०१ लाख ७० हजार रूपयाचे व १० चक्का ट्रक वाहन क्र. MH- ४० / CD- २२०२ किंमती अंदाजे १५ लाख रूपये असा एकूण किंमती अंदाजे १६ लाख ७० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर जप्ती मुद्देमाल व फरार चालक व मालक यांचे विरुद्ध कलम ११२१) ड प्राणी संरक्षण कायदा ५ (१) व. ९ प्राण्यास निर्दयतेने वागणूक अधिनियम, फलम १७९ अन्य गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कार्यवाही नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदिप पखाले यांचे आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सहायक पोलीस निरीक्षक अनिल राऊत, पोलीस हवालदार विनोद काळे, नाना राऊत, ईकबाल शेख, पोलीस नायक संजय बरोदीया, प्रमोद भोयर चालक मोनू शुक्ला यांनी पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

घरफोडी करणाऱ्या गुन्हयातील आरोपी गजाआड

Fri Aug 11 , 2023
– स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण यांची कारवाई कोंढाळी :- पोलीस स्टेशन कोंढाळी येथे दिनांक २८/०७/२०२३ चे १०.०० वा. ते दिनांक ०३/०८/२०२३ मे १७. ०० वा. दरम्यान फिर्यादी नामे- साधना हनुमंतराव वाघ, वय ५३ वर्ष, रा. उमरी वाहता. हिंगणा जि. नागपुर यांची आईची प्रकृती खराब असल्याने फिर्यादी आपले पतीसह नागपुर येथे गेले होते व दिनांक ०३/०८/२०२३ रोजी नागपुर वरून उमरी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com