खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीविरूद्ध गुन्हा नोंद

अरोली :- अंतर्गत १५ किमी अंतरावर मौजा खात येथे दिनांक ०१/०१/२०२४ चे १८.४५ वा. दरम्यान फिर्यादी नामे तुकाराम वातु केळवदे, वय ३५ वर्ष, रा. खात हा गावो गावी जाउन मुरमुरे विकण्याचे काम करतो फिर्यादीचे घराचे काही अंतरावर फिर्यादीची मामी नामे गं. भा. छविबाई दुर्योधन बागडे यांची इंदिरा गांधी चौक खात येथे भजे नाश्त्याची दुकान आहे. फिर्यादीचे मामीचे डोळयाचे ऑपरेशन झाल्याने मागील १० दिवसा पासुन त्याची भजे नाश्त्याची दुकाण फिर्यादी चालवित असुन फिर्यादीचे गावात राज उर्फ अनिल कैलास कुमार हा राहत असुन त्याला फिर्यादी ओळखतो. दिनांक ०१/०१/२०२४ रोजी सायंकाळी ०६/०० वा. सुमारास फिर्यादी भजे नाश्त्याचे दुकाण चालवित असतांना तेव्हा सुरेंद्र नामदेव देवतारे व अभिमन मांढरे हे दोघेही फिर्यादीचे नास्त्याचे दुकाणात आले व फिर्यादी कडुन फिंगर घेवुन खात होते तेवढ्‌यातच आरोपी नामे राज उर्फ अनिल कैलास कुमार हा आला व फिर्यादी याला म्हणाला की, मला दारु पिण्याकरीता ५०/-रु दे तेव्हा फिर्यादी त्याला म्हटले की, मी तुला कशाला पैसे देऊ असे म्हटले असता त्यानी फिर्यादी सोबत वाद विवाद घातला. तु मला पैसे दिले नाही तर तुला जिवानी मारून टाकीन असे राज उर्फ अनिल कैलास कुमार याने म्हणुन त्यानी त्याचे पैन्टचे खिशातुन कोणते तरी धारधार वस्तु काढुन फिर्यादीचे डाव्या हाताचे खांद्यावर तसेच पोटावर, छातीवर मारुन जिव घेण्याचा ईराद्याने गंभीर जखमी केले, तेवढ्यातच फिर्यादीची पत्नी  पुजा केळवदे ही आली व राज उर्फ अनिल कैलास कुमार याला तु माझ्या पतीला कशाला मारत आहे असे म्हणुन त्याला बाजुला केले. त्यानंतर राज उर्फ अनिल कैलास कुमार हा तिथुन निघुन गेला. त्यानंतर फिर्यादीला उपचारा करीता चुलत भाऊ संदिप सुभाष केळवदे, बहीण मंदा देवराव मांढरे यांनी सरकारी दवाखाना खात येथे आणले त्या ठिकाणी फिर्यादीचा प्रथम उपचार करुन तेथुन सरकारी दवाखाना भंडारा येथे रेफर केले. वार्ड क्र. १४ जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे फिर्यादीचा उपचार सुरु आहे.

सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. अरोली येथे आरोपीविरुध्द कलम ३०७ भादवि कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर घटनास्थळी स.पो.नि. निशांत फुलेकर पोस्टे अरोली यांनी भेट दिली असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास स.पो.नि. निशांत फुलेकर हे करीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गांजा तस्करी करणारा आरोपी ८६ किलो ७२० ग्रॅम गांजासह गजाआड

Wed Jan 3 , 2024
– स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर ग्रामिण ची कारवाई  बुट्टीबोरी :-पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार यांचे आदेशाने व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दिनांक ०१/०१/२०२४ रोजी नागपुर उपविभागात अवैध धंद्यांवर आळा घालणे संबंधाने पेट्रोलिंग करीत असताना पोलीस ठाणे बुट्टीबोरी हद्दीतून तेलंगणा कडून नागपूरकडे गाडी क्र. UP 84 F 8205 चारचाकी वाहनाने अंमली पदार्थ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com