एमआयडीसी बोरी :- पो.स्टे. एमआयडीसी बोरी हद्दीत यातील फिर्यादी यांनी दि. १७/१२/२०२३ रोजी पोस्टेला येवून तोंडी रिपोर्ट दिली की फिर्यादीची नातीन वय १७ वर्षे हि दि. १५/१२/२०२३ ला दुपारी १४/०० वा. दुपारी ०२/०० वा. कॉलेज मधुन घरी परत आली व काही वेळा थांबुन कपडे बदलवुन परत बाहेर जात होती. तेव्हा फिर्यादीने मुलीला हटकले कुठे चालली असे विचारले असता तिने फिर्यादीला बाहेरुन येतो असे सांगितले तेव्हा पासुन ती आज पर्यंत घरी आली नाही व मोबाईल नंबर बंद आहे तेव्हा पासुन फिर्यादीने नातीनच्या नातेवाईकाकडे व आजुबाजुला शोध केला मिळुन आली नाही तसेच घरासमोर राहणारा आकाश राजु बावणे हा सुद्धा दिसुन आला नाही.
मुलीचे वर्णन :- रंग गोरा चेहरा गोल, उंची -०५ फुट, मराठी व हिंदी भाषा बोलते पांढऱ्या रंगाचा सलवार पिवळया रंगाचा चुडीदार पायजामा घालुन गेली फिर्यादीची नातीन वय १७ वर्ष हिला घरासमोर राहणारा आकाश राजु वावणे याने पळुन नेले असावे असा फिर्यादीला संशय आहे.
सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरुन पो.स्टे. एमआयडीसी बोरी येथे आरोपीविरुध्द कलम ३६३ भादंवि. कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. आरोपीचा शोध घेणे सुरू असून सदर गुन्हयाचा पुढील तपास सहायक फौजदार प्रशांत काळे व. नं. ९६९ पोस्टे एमआयडीसी बोरी हे करीत आहे.