पळवून नेणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल

उमरेड :- दिनांक १०/०८/२०२३ चे ०९.०० वा. सुमारास पो.स्टे. उमरेड हद्दीत फिर्यादी व तिचा मुलगा व मुलगी सर्व जेवन केले आणि रात्री झोपले रात्री ०२/०० वा. सुमारास फिर्यादीला जाग आली तेव्हा तिची मुलगी फिर्यादीला दिसली नाही म्हणुन फिर्यादीने तिच्या मोबाईलवर फोन केला तर ती बोलली मी माझ्या मैत्रीणीसोबत दवाखान्यात आहे. उद्या सकाळी ०६/०० वा. घरी येते परंतु ती सकाळी घरी आली नाही. म्हणुन फिर्यादीने तिच्या मोबाईलवर फोन केला तर तिचे दोन्ही सिम बंद दाखवित आहे. तिचा नातेवाईकांकडे व आजुबाजुला शोध घेतला परंतु कुठे मिळून आली नाही. कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादीचे मुलीला फुस लावून पळवून नेले आहे. सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. उमरेड येथे आरोपीविरुध्द कलम ३६३ भादवि कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. आरोपीचा शोध घेणे सुरू असून सदर गुन्हयाचा पुढील तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक सुचौता मंडवाले पोस्टे उमरेड या करीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मानसून आहार : प्रतिरक्षा-बढ़ाने वाले इन 3 खाद्य पदार्थों का सही से सेवन करें - डॉ. रोहिणी पाटिल, पोषण विशेषज्ञ

Wed Aug 16 , 2023
मुंबई :- जैसे-जैसे मानसून का सीजन आता है, मौसमी बीमारियों से बचाव के लिए अपनी प्रतिरक्षा प्रणाली को मजबूत करना आवश्यक हो जाता है। आहार में प्रतिरक्षा बढ़ाने वाले खाद्य पदार्थों को शामिल करके संक्रमण के खिलाफ प्राकृतिक सुरक्षा प्राप्त की जा सकती है। आइए तीन शक्तिशाली मानसून सुपरफूड्स के बारे में जानें, जो आपकी प्रतिरक्षा को मजबूत कर सकते […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!