महानिर्मिती कनिष्ठ अभियंता, सहाय्यक अभियंता परीक्षा २६ ते २८ एप्रिल

६६१ जागांकरिता ८०४३५ उमेदवार

◆ राज्यभरात ११८ केंद्रांवर परीक्षा

◆ परीक्षेसंबंधी माहिती महानिर्मिती संकेतस्थळावर

 नागपूर :-महानिर्मिती जाहिरात क्र.१०/२०२२ व अधिसूचना ३६७१ दिनांक २१ एप्रिल २०२३ अन्वये प्रसिद्ध करण्यात आलेल्या कनिष्ठ अभियंता व सहाय्यक अभियंता या पदांच्या सरळसेवा भरतीच्या अनुषंगाने सदर पदांची ऑनलाईन परीक्षा २६ ते २८ , एप्रिल २०२३ रोजी घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्र, ठिकाण, तारीख, वेळ इत्यादी तपशीलवार माहिती, महानिर्मितीच्या www.mahagenco.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, याची संबंधित सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

एकूण ६६१ जागांकरिता ८०४३५ उमेदवारांनी अर्ज केला असून राज्यभरातील ११८ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. सहाय्यक अभियंता जागा ३३९, एकूण अर्ज प्राप्त ४३३४५. कनिष्ठ अभियंता जागा एकूण ३२२, एकूण प्राप्त अर्ज ३७०९०. एकूण अर्ज ८०४३५ आले असून २६ एप्रिल ला ६३ केंद्रे, २७ एप्रिल ला ११८ केंद्रे, २८ एप्रिल ला २८ केंद्रांवर ही परिक्षा घेण्यात येणार आहे. २६ एप्रिलला दोन सत्रांमध्ये, २७ एप्रिल ला तीन सत्रांमध्ये तर २८ एप्रिल ला एका सत्रात परीक्षा घेण्यात येणार आहे.

उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत भ्रमणध्वनीवर एस.एम.एस. देखील पाठविण्यात आले आहे. परिक्षेसंदर्भात काही अडचण निर्माण झाल्यास अधिक माहितीकरिता ०२२- ६९४३५०००, agmhrrc@ mahagenco.in तसेच आय.बी.पी.एस. हेल्प डेस्क नंबर 18001034566 यावर संपर्क साधावा.

महानिर्मितीची भरती प्रक्रिया गुणवत्तेच्या आधारावर पारदर्शकपणे केली जाते. उमेदवारांनी त्यांना कोणीही व्यक्ती, नोकरी मिळवून देतो असे आश्वासन देत असल्यास त्यांच्या भूलथापांना किंवा आमिषाला बळी पडू नये, कुठलाही गैरप्रकार निदर्शनास आणून दिल्यास महानिर्मितीतर्फे तातडीने उचित कारवाई करण्यात येईल असे महानिर्मितीचे कार्यकारी संचालक(मानव संसाधन) डॉ.धनंजय सावळकर यांनी कळविले आहे.

NewsToday24x7

Next Post

गडचिरोली पोलीस दल पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन प्रोजेक्ट उडान अंतर्गत “रोजगार मेळाव्याचे” आयोजन

Tue Apr 25 , 2023
गडचिरोली :- गडचिरोली जिल्हयातील सुशिक्षीत बेरोजगार युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन पोलीस अधीक्षक गडचिरोली  नीलोत्पल सा. यांचे मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलीस दल व पार्कसन्स स्किल सेंटर, नागपुर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 25/04/2023 रोजी “रोजगार मेळावा” पोलीस मुख्यालय परिसरातील जेटीएससी हॉल येथे पार पाडण्यात आला. या रोजगार मेळाव्यात दुर्गम-अतिदुर्गम भागातील 60 बेरोजगार […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com