पो.स्टे. बोरी :- पो.स्टे.बोरी हद्दीत फिर्यादीची अल्पवयीन मुलगी वय १७ वर्ष ११ महिने ही दिनांक १६/०७/२०२३ चे सायंकाळी ०६.०० वा. घरी कुणालाही न सांगता घरून निघून गेली. ती आजपावेतो घरी परत आली नाही. तिचा आजुबाजुला व मित्र मैत्रिणीकडे शोध घेतला मिळून आली नाही. मुलीचे गावातील संशयीत आरोपी नामे- अमीत धुर्वे रा. आजनगाव हिंगणा बोरी याचेसोबत प्रेमसंबंध आहे असे समजले अमीत धुर्वे हा सुध्दा घरी नसल्याचे समजले त्याने फिर्यादीच्या मुलीला फूस लावून पळवून नेले आहे.
सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरुन पो.स्टे. बोरी येथे आरोपीविरुध्द कलम ३६३ भादवि कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस हवालदार मांढरे पोस्टे बोरी हे करीत आहे.