उमरेड :- पो.स्टे. उमरेड स्थीत फिर्यादीला सकाळी ०६:०० वा. झोपुन उठल्यावर तिची मुलगी वय १३ वर्ष हि घरी दिसुन आली नाही तेव्हा फिर्यादिला वाटले कि ती कुठे तरी गेली असेल असे समजून कामावर निघून गेली. फिर्यादी परत ०६:०० वा. आली असता ती पुनः घरी दिसुन आली नाही. फिर्यादीने आजुबाजुला शोध घेतला असता समजले कि गावातील मुलगा वय अंदाजे १४ वर्ष घरी नव्हता म्हणून फिर्यादीची मुलगी व गावातील मुलगा यांचा दोघाचा गावात व नातेवाइकांकडे शोध घेतला असता मिळुन आले नाही.
सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. उमरेड येथे आरोपीविरुध्द कलम ३६३ भादवि कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. आरोपीचा शोध घेणे सुरू असून सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खोटोले पोस्टे उमरेड हे करीत आहे.