– निवडणूक अधिकार्यांवर हल्ला, वाहनांची केली तोडफोड
– ईव्हीएम मशिन पळवून नेण्याचा प्रयत्न झालयाचा आरोप
नागपूर :- विधानसभा निवडणूकीदरम्यान मध्य नागपूर मतदार संघात निवडणूक अधिकार्यांवर हल्ला करीत वाहनांची तोडफोड, तसेच ईव्हीएम मशिन पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अखेर कोतवाली पोलिसांनी काँग्रेस उमेदवार बंटी शेळकेसह त्याच्या समर्थकांवर विविध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल केले.
त्यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली. याप्रकरणाने अति गंभीर स्वरुपाचे वळण घेतले आहे. त्यामुळे काँग्रेस उमेदवार बंटी शेळके व त्यांचे समर्थक हे चांगलेच अडचणीत आले आहेत. शासकीय कामात अडथळासह विविध गंभीर स्वरुपाचे गुन्हे त्यांच्यावर दाखल करण्यात आले आहेत. या घटनेंनंतर महाल, बडकस चौकासह बंटी शेळके यांच्या घराजवळ तनावाचे वातावरण बघता पोलिस सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.