संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या न्यू येरखेडा रहिवासी 22 वर्षीय तरुणीसोबत सैन्य विभागाच्या गार्ड रेजिमेंटल सर्व्हिस मध्ये सैनिक पदी कार्यरत तरुणाने लग्नाचे आमिष देत तिच्याशी वारंवार लैगिंक संबंध प्रस्थापित केले.दरम्यान तिला गर्भधारणा झाल्याने तिचे गर्भ नष्ट करण्याचा उद्देशाने तिच्या पोटावर हात बुक्क्याने मारहाण करून जीवानिशी ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार 8 जुलै ला निदर्शनास आला असून यासंदर्भात पीडित तरुणीने स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी सैनिक बिरेन अकाण तिमुंग वय 32 वर्षे रा जी. आर. सी.कॅन्टोन्मेंट कामठी विरुद्ध भादवी कलम ३७६(२),एन,३५४(ड),३१५,२९४,५०६(२) अनव्ये गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर पीडित तरुणी ही पंचशील नगर,न्यू येरखेडा येथील रहिवासी असून अविवाहित आहे.हिच्यावर वक्रदृष्टी ठेवून असलेले सैनिक आरोपी बिरेन तिमुंग ने पोरवाल कॉलेज समोरून तिचा पाठलाग करून तिच्याशी संबंध गाठून तिला लग्न करण्याचे आमिष देत तिच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित केले.यावर पीडित तरुणीला गर्भधारणा प्राप्त झाल्याने तिने आरोपी कडे लग्न करण्याचा सपाटा लावला यावर आरोपीने तिचा गर्भ नष्ट करण्याच्या उद्देशाने तिच्या पोटावर हात बुक्क्याने मारहाण करून अश्लील शिवीगाळ देत जीवानिशी ठार मारण्याची धमकी दिली.अखेर न्याय मिळण्याच्या उद्देशाने सदर पीडित तरुणीने पोलीस स्टेशन गाठून आपबीती सांगून दिलेल्या तक्रारीवरून उपरोक्त नमूद विवाहित सैनिक आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.