संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 10 :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या खैरी गावात एका विधवा महिला व तिच्या 17 वर्षीय मुलीवर हल्ला करून मारझोड करीत विनयभंग करणाऱ्या खैरी गावातील 18 लोकांवर भादवी कलम 354,294,323,143,147 सहकलम पोक्सो 8/12 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीमध्ये फिर्यादी पीडित महिलेचा सख्खा भाऊ व मुलाचा समावेश आहे तसेच आरोपीसंख्यात अजून वाढ होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खैरी गावातील बुद्ध विहाराजवळ रहिवासी असलेले पीडित फिर्यादी नलिनी रडके वय 49 वर्षे यांच्या पतीचा 7 नोव्हेंबर ला दुःखद निधन झाल्याने घरात दुखमय वातावरण होते. अशा परिस्थितीत दुसऱ्याच दिवशी पीडित महिलेचा सख्खा भाऊ व तिचा सख्खा मुलगा हा संगनमताने इतर लोकांसह घर खाली करून दे, घराचा हिस्सा दे नाहीतर घर विकून पैसे दे अशा विविध कारणाहून झालेंल्या भांडणात आरोपितांनी सदर पीडित विधवा महिलेसह तिच्या 17 वर्षोय मुलीला अश्लील शिवीगाळ देऊन मारझोड करून विनयभंग केल्याची घटना 8 नोव्हेंबर ला सायंकाळी पाच दरम्यान घडली असून सदर पीडित महिलेच्या तक्रारीवरून अठरा आरोपी विरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक कल्पना कटारे करीत आहेत .