सावत्र मुलीला मारहाण करणाऱ्या आई वडीला विरोधात गुन्हा दाखल

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या परिसर रहिवासी एक 12 वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची घटना 21 जून ला घडली होती मात्र याबाबत त्या मुलीच्या आई वडिलांनी जुनी कामठी पोलीस स्टेशन ला कुठलीही तक्रार नोंदविली नव्हती.मात्र ही अल्पवयीन मुलगी 25 जून ला रेल्वे स्टेशन बडनेरा येथे आढळून आली यावेळी मुलीने सांगितलेल्या पत्त्यावरून तिला जुनी कामठी पोलीस स्टेशन ला कळविण्यात आले .मात्र मुलगी घराबाहेर जाऊन बेपत्ता होऊनही पोलिसांना माहिती न दिल्याने यावर संशय बळकावून सदर मुलीस पाटणकर चौक नागपूर येथील बालकल्याण समिती समोर उभे केले असता बालकल्याण समितीने सदर पीडित मुलीस तिचे सावत्र आई वडील अत्याचार करीत असून मारहाण करीत असल्याचे सांगितल्याने बाल हक्क समितीच्या आदेशानव्ये सदर पीडित सावत्र मुलीच्या आई वडीला विरुद्ध बाल न्याय अधिनियम 2015 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

12 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Thu Jun 27 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कोळसा टॉल रहिवासी आरोपीने 12 वर्षोय अल्पवयीन मुलीला कामानिमित्त तिला आपल्या घरात बोलावून घराचे दार बंद करून तिचा विनयभंग केल्याची घटना काल सकाळी 10 वाजता घडली असून यासंदर्भात जुनी कामठी पोलिसांनी आरोपी बशीर भाई अहमद वय 55 वर्षे रा कोळसा टॉल कामठी विरुद्ध भादवी कलम 354,354(अ),भादवी सह […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com