विनयभंग करणाऱ्या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल 

कोंढाळी :- दिनांक १७/०८/२०२३ से १५.३० वा. दरम्यान यातील फिर्यादी ही घरी हजर असता आरोपी नामे- मुकेश मनोहर खबसे, रा. चंदनपार्डी हा घरात आला व पिण्यासाठी पाणी दया असे म्हटले असता फिर्यादीने पिण्यास पाणी दिल्यावर आरोपीने फिर्यादीचा उजवा हात पकडला व फिर्यादीस अब्रुस लज्जा येईल असे कृत्य करून फिर्यादीचा विनयभंग केला.

सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रिपोर्टवरून पो.स्टे. कोंढाळी येथे आरोपीविरुध्द कलम ४५२ ३५४, ३५४(अ) भादवि. कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. गुन्हयाचा पुढील तपास सहायक फौजदार सुनिल बन्सोड हे करीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राणी अवंतीबाई लोधी यांची १९२ वी जयंती उत्साहात साजरी

Sat Aug 19 , 2023
कन्हान :- लोधी समाज कन्हानद्वारे विरांगणा राणी अवंतीबाई लोधी यांची १९२ वी जयंती उत्साहाने थाटात साजरी करण्यात आली. विरांगणा राणी अवंतीबाई लोधी यांची १९२ वी जयंती निमित्य लोधी समाज कन्हानद्वारे ठाकुर सावजी भोजनालय ढाबा येथे प्रामुख्याने उपस्थित ठाकुर सावजी भोजनालया चे संचालक किरण ठाकुर यांच्या हस्ते विरांगणा राणी अवंतीबाई लोधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलित करुन कार्यक्रमाची सुरूवात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com